घरताज्या घडामोडीनाशिक जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक नवे रूग्ण

नाशिक जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक नवे रूग्ण

Subscribe

शहरात कोरोनाबाधित मृतांचा आकडा तीनशे

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि.३) दिवसभरात १ हजार १८ नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 120, नाशिक शहर 876 आणि मालेगावमधील २२ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ११ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक शहर ५, नाशिक ग्रामीणमधील ५ आणि मालेगावातील एका रूग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात आजवर एका दिवसात सर्वाधिक रूग्ण बाधित आढळून आले आहेत. शहरातील मृत रूग्णांची संख्या तीनशे झाली आहे. जिल्ह्यात १६ हजार 603 वर पोहचला आहे. एकट्या नाशिक शहरात ११ हजार १७२ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात आजवर ११ हजार 7८१ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण २ हजार 7४7, नाशिक शहर ७ हजार 743, मालेगाव 1 हजार १72 आणि जिल्ह्याबाहेरील १३9 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ४ हजार २८९ रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण १ हजार २७, नाशिक शहर ३ हजार १२९, मालेगाव 1२8 आणि जिल्ह्याबाहेरील 5 रूग्ण आहेत. सोमवारी दिवसभरात 909 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय ३, नाशिक महापालिका रूग्णालय 640, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 1६, मालेगाव रूग्णालय ११, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 174 रूग्ण दाखल झाले.

- Advertisement -

नाशिक कोरोना अपडेट

पॉझिटिव्ह रूग्ण-16,606 (मृत-533)
नाशिक ग्रामीण-3901 (मृत-127)
नाशिक शहर-11,172(मृत-300)
मालेगाव शहर-1366 (मृत-86)
जिल्ह्याबाहेरील-164 (मृत-20)

‘कृउबा’चे माजी सभापती शिवाजी चुंबळे पॉझिटिव्ह

नाशिक जिल्ह्यात तीन आमदार कोरोनाधित आढळून आले असून त्यांच्या पाठोपाठ आता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी चुंबळे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उपचारार्थ त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू केला असून संशयितांना क्वारंटाईन केले जात आहे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -