चिपी विमानतळाचा प्रश्न लवकरच निकाली; मुख्यमंत्री देणार चिपी विमानतळाला भेट

कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा प्रश्न आता लवकरच सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा हाती घेतला असून येत्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाला भेट देण्याचे निश्चित केले आहे.

Mumbai

कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा प्रश्न आता लवकरच सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा हाती घेतला असून येत्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाला भेट देण्याचे निश्चित केले आहे. या भेटीत त्यांनी चिपी विमानतळासंदर्भात विशेष बैठक बोलवली असून त्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बहुचर्चित चिपी विमानतळाचा प्रश्न आता तरी सुटतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

देशातील बंद विमानतळांना जोडण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने ‘उडान’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत नांदेड, जळगाव, कोल्हापूर, नाशिक या शहरांमधील विमानतळ कार्यान्वित झाले आहेत. याच योजनेच्या पुढील टप्प्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, मुंबई, नाशिक तसेच पुणे या शहरांशी जोडले जाणार आहेत. त्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ हे देखील एक असून त्याच्या उद्घाटनाचा केलेला बट्याबोळ उभ्या महाराष्टाने पाहिला आहे. फडणवीस सरकारच्या काळात या विमानतळाचे घाईघाईने उद्घाटन केल्यानंतर पुन्हा या विमानतळाचा प्रश्न पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या विमानतळाच्या प्रश्नावरुन अनेकांनी राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या देखील झाडल्या आहेत. या सर्व अनुषंगाने सध्या शिवसेनेने देखील हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे, या सर्वांची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे, आगामी कोकण दौऱ्यात हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या आठवड्यात मुख्यमंत्री कोकण दौरा करणार आहेत. ज्यात ते गणपतीमुळे येथे भेट देणार असून त्यानंतर कोकणातील प्रसिद्ध अशा अंगणेवाडी जत्रेला देखील भेट देणार आहेत. या भेटी दरम्यान त्यांनी कोकणातील विविध प्रकल्पांचा आढावा घेणाऱ्या अनेक बैठकांचे आयोजन केले असून यातच चिपी या विमातळाच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर हा पहिलाच कोकण दौरा असणार आहे. त्यामुळे, या दौऱ्यात कोकणासाठी काही तरी विशेष घोषणा करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांचा असणार आहे. त्यामुळे, या दौऱ्यात चिपी विमानतळाच्या प्रश्नावर घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here