2014 ची चूक पुन्हा करणार नाही

पवारांच्या बारामतीत अमित शहांचा हल्लाबोल

Baramati
amit-shah
भाजप अध्यक्ष अमित शहा

2014 मध्ये बारामतीत महादेव जानकारांना 35 हजार मते कमी पडली. त्यावेळी आम्ही कमळ चिन्ह न देण्याची चूक केली होती. पण, आता अशी चूक होणार नाही असे अमित शहा यांनी म्हटले आहे. बारामतीतील युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारसभेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. सहकार, शेती, उद्योग, दूध उत्पादन या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन होता. पण, पवार सत्तेत असताना राज्याचा नंबर घसरल्याची टीका यावेळी अमित शहा यांनी केली. यावेळी अमित शहा यांनी बारामती, पुणे, पश्चिम महाराष्ट्राला दिलेल्या आर्थिक मदतीची माहिती देखील दिली. तर, सत्तेत 50 वर्षे राहण्याची कला केवळ शरद पवारांना असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

राहुल बाबा गरिबी हटाव म्हणून किती काळ लोकांना मूर्ख बनवणार? असा सवाल यावेळी अमित शहा यांनी केला. 10 वर्षे सत्तेत असताना काय केले? याचा हिशेब महाराष्ट्राला द्या. तुम्ही सत्तेत असताना महाराष्ट्राचा विकास झाला की घसरण? असा सवाल अमित शहा यांनी केला. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान आणि राहुल कंपनीला दुःख झाले झाल्याची टीका यावेळी अमित शहा यांनी केली. उद्या आमची सत्ता आली नाही तरी काश्मीरला भारतापासून वेगळे होऊ देणार नाही असे देखील अमित शहा यांनी आपल्या बारामतीतील भाषणामध्ये म्हटले आहे.

मुळावर घाव घाला

बारामतीत मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. घाव घालायचा तर मुळावर घाला. महाराष्ट्राचे भले होईल अशी टीका यावेळी अमित शह यांनी केली. यावेळी बोलताना ‘काहीही करून बारामती जिंकायची’ असा निर्धार अमित शहा यांनी व्यक्त केला. तर, देशात सर्वत्र मोदी मोदी आवाज ऐकू येत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here