राज्यात ४,४९६ नवे रुग्ण, १२२ जणांचा मृत्यू

राज्यात १२२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,६८२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ४,४९६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,३६,३२९ झाली आहे. राज्यात ८४,६२७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १२२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,६८२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात १२२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १९, ठाणे ५, नवी मुंबई मनपा ३, वसई विरार मनपा २१, नाशिक ३, पुणे १३, सातारा ७ आणि नागपूर १७ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १२२ मृत्यूंपैकी ८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

आज ७,८०९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६,०५,०६४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६,६४,२७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,३६,३२९ (१७.९७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,११,०३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.