घरमहाराष्ट्रनाशिकनगर जिल्ह्यात ५ नवे कोरोनाबाधित; दोन महिलांचा मृत्यू

नगर जिल्ह्यात ५ नवे कोरोनाबाधित; दोन महिलांचा मृत्यू

Subscribe

पुण्याच्या प्रयोगशाळेकडून जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात दिवसभरात ५ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यात दोन महिलांचा समावेश असून या दोघींचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तीन रुग्ण आधी बाधित सापडलेल्या रिक्षाचालकाच्या घरातील आहेत.

दरम्यान नगर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७२ झाली आहे. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात एकूण चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तत्पूर्वी शहरातील रामचंद्र खुंट येथील एका ६७ वर्षीय महिलेचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. या महिलेने एका खासगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. त्या रुग्णालयाने तिचा स्त्राव तपासणीसाठी खासगी मान्यताप्राप्त लॅबकडे पाठवला होता. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, या महिलेच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीचे स्राव नमुने घेण्यात आले असून त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी बाधित आढळलेल्या नगरच्या जुना मंगळवार बाजारातील रिक्षाचालकाची पत्नी, मुलगा आणि मुलगी हे तिघे जण बाधित आढळले आहेत. तर मुळची मुंबई येथील ७५ वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे आपल्या मुलीकडे आली होती. या महिलेला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तोदेखील पॉझिटिव्ह आल्याने या महिलेसदेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच या महिलेचादेखील मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -