घरCORONA UPDATECorona: धक्कादायक! पुण्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये वृद्धाने केली आत्महत्या

Corona: धक्कादायक! पुण्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये वृद्धाने केली आत्महत्या

Subscribe

पुण्यात ६० वर्षीय वृद्धाने क्वारंटाईन सेंटरमध्ये आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या कोंढवा येथे काल ही घटना घडली. या व्यक्तीसह त्याचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याने ते दोघेही पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत होते. अनेकदा रुग्ण कोरोनाच्या भीतीमुळेच आत्महत्या करत असल्याच्या घटना घडत आहेत. पुण्यातील हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्या रुग्णाने आत्महत्या का केली हे अद्याप उघड झालेले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २०४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ११ हजार ९८७वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार २६ झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. तसेच २४ तासांत ३ हजार ५२२ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार २६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५४.३७ % एवढा झाला आहे.

हेही वाचा –

- Advertisement -

युद्ध झालं, तर अमेरिकी सैन्य भारताच्या बाजूने, व्हाईट हाऊसचं आश्वासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -