घरताज्या घडामोडी२४ तासांत ९१ पोलीस कोरोनाबाधित; तर ९६९ पोलिसांची करोनावर मात

२४ तासांत ९१ पोलीस कोरोनाबाधित; तर ९६९ पोलिसांची करोनावर मात

Subscribe

गेल्या २४ तासांत राज्यातील ९१ पोलिसांना कोरोनाचीबाधा झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या २ हजार ४१६ इतकी झाली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या कोरोनाशी लढा देण्याकरता डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, या कोरोना विषाणूने आपला विळखा पोलिसांच्या भोवती अधिकच घट्ट केला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यातील ९१ पोलिसांना कोरोनाचीबाधा झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या २ हजार ४१६ इतकी झाली आहे. तर २६ पोलिसांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे तब्बल ९६९ पोलिसांनी कोरोनाचा पराभव केला आहे. तर सध्या १ हजार ४२१ कोरोनाबाधित पोलिसांवर सध्या उपचार सुरु आहेत.

लोकांनी सुरक्षित आपल्या घरी राहावं म्हणून पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपला जीव धोक्यात घालून उन्हातान्हात रस्त्यांवर बंदोबस्तास उभे आहेत. या पोलिसांना देखील कोरोनाने घेरले असून त्यांचा जीव देखील आता धोक्यात आला आहे.

- Advertisement -

२४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या चोवीस तासात आठ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी मृतांची संख्याही पाच हजारांच्या पुढे गेली. गेल्या २४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १ लाख ८२ हजार १४३ वर पोहोचला आहे. तर मृतांची संख्या वाढून ५ हजार १६४ झाली आहे.


हेही वाचा – गेल्या २४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -