घरदेश-विदेशपेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड, रेल्वे यासह 'हे' नियम उद्यापासून बदलणार

पेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड, रेल्वे यासह ‘हे’ नियम उद्यापासून बदलणार

Subscribe

उद्यापासून भारतात बरेच मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार असून याचा फायदा तर तोटा दखील होणार आहे.

१ जून २०२० म्हणजे उद्यापासून भारतात बरेच मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. एकीकडे तुम्हाला या नवीन नियमांपासून आराम मिळेल, दुसरीकडे जर तुम्ही काही गोष्टींची काळजी न घेतल्यास तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकतं. यामध्ये रेल्वे, विमान कंपन्या, गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलचे दर, रेशनकार्ड इत्यादींचा समावेश आहे. चला या महत्त्वपूर्ण बदलांविषयी जाणून घेऊया.

उद्यापासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना सुरु

देशातील गरिबांना दिलासा देण्यासाठी उद्यापासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून होईल. या योजने अंतर्गत रेशनकार्डचा लाभ देशात कुठुनही घेता येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेज जाहीर करताना याचा उल्लेख केला होता. केंद्र सरकारच्या या योजनेचा ६७ कोटी लोकांना फायदा होईल.

- Advertisement -

३० सप्टेंबरपर्यंत आधार कार्डवरून लिंक करावं लागणार

रेशन कार्डला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. या संदर्भात केंद्रीय अन्न मंत्रालयाने असं म्हटले आहे की रेशनकार्डधारकांना आधारशी जोडले गेलेलं नसलं तरी रेशन मिळणार आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असे निर्देश देण्यात आले आहेत की कोणत्याही लाभार्थ्याला त्यांच्या वाट्याचे रेशन नाकारू नये.

एलपीजी सिलेंडरच्या किंमती बदलणार

उद्यापासून देशात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल होणार आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरूवातीला एलपीजी सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असतो आणि त्यानुसार एलपीजीच्या किंमती बदलतात. म्हणजेच जर उद्या त्याची किंमत वाढली तर आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील. मेमध्ये १९ किलो आणि १४.२ किलो अनुदानित एलपीजी सिलेंडर्स स्वस्त झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – उद्यापासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना सुरु होणार


सिलेंडरची सध्याची किंमत

दिल्लीत १४.२ किलो अनुदानित एलपीजी सिलेंडर १ मे रोजी १६२.५० रुपयांनी स्वस्त झाला. यानंतर याची किंमत ५८१.५० रुपये झाली आहे, जी आधी ७४४ रुपये होती. कोलकाता येथे सिलेंडरची किंमत ७४४.५० रुपयांवरून ५८४.५० रुपये, मुंबईत ७१४.५० रुपयांवरून ५७९ रुपये आणि चेन्नईमध्ये ५६९.५० रुपये झाला आहे.

उद्यापासून रेल्वेच्या २३० गाड्या धावणार

लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे १ जूनपासून २०० अतिरिक्त गाडय़ा चालवणार आहे, त्या एसी नसलेल्या असतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विटद्वारे याची माहिती दिली. आधीपासून कार्यरत ३० गाड्या या गाड्यांसह सुरू राहतील.

विशेष म्हणजे रेल्वेने चार महिन्यांपूर्वीच या गाड्यांसाठी अ‍ॅडव्हान्स तिकिटांची बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच तत्काळ कोट्यातून तिकिट बुकिंग सुरू झालं आहे. रविवारी सकाळी आठ वाजता ही सुविधा सुरू झाली आहे. तथापि, रेल्वेने तिकिटांच्या आगाऊ बुकिंगच्या नियमात काही बदल केले आहेत. लॉकडाऊनमध्ये ३० दिवस अगोदरच तिकिट रिढर्वेशन करता येत होतं. पण आता १२० दिवस आधी रिझर्वेशन करता येणार आहे.

या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार

यापूर्वी अनेक राज्यांनी व्हॅट वाढवून इंधन महाग केलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार, १ जूनपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे आता पेट्रोल किंमत एक लिटरसाठी ७६.३१ वरून ७८.३१ रुपये इतकी होणार आहे. तर डिझेलची किंमत ६६.२१ वरून ६८.२१ रुपये इतकी आकारली जाणार आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलवर क्रमशः २६ टक्के व २४ टक्के व्हॅटदेखील घेतला जाणार आहे. या दरवाढीसंबंधची परिपत्रक शनिवारी राज्य सरकारने काढले असून त्यावर उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे. मिझोरम सरकारने १ जूनपासून पेट्रोलवरील अडीच टक्के आणि डिझेलवर पाच टक्के व्हॅट वाढवण्याची घोषणा केली असून यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतील. याशिवाय जम्मू-काश्मीरनेही किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एक जूनपासून पेट्रोलच्या किंमतीत दोन रुपयांनी आणि डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन तोटा पूर्ण करण्यासाठी तेल विपणन कंपन्या जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवू शकतात.

गो एयर देशांतर्गत उड्डाणे सुरू करणार

सर्वसामान्यांना परवडणारी विमान सेवा देणारी गो एयर १ जूनपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करणार आहे. इतर कंपन्यांनी २५ मे रोजी याची सुरूवात केली. परंतु काही कार्यरत आणि नियामक समस्यांमुळे गो एअरला उशीर झाला. नागरी उड्डाण हरदीपसिंग पुरी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की सर्व भागधारकांसाठी व्यापक मानक कार्यप्रणाली (Comprehensive standard operating procedure) अंतर्गत २५ मेपासून विमान कंपन्यांना घरगुती उड्डाणे करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


हेही वाचा – सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम: तीन फुटांचं अंतर, मास्क अनिवार्य


१ जूनपासून २० मार्गावर बस चालवण्याची तयारी

उत्र प्रदेशने १ जूनपासून राज्यातील विविध मार्गांवर बसगाड्यांची तयारी केली आहे. यासंदर्भात, रोडवेज मुख्यालयाने प्रयागराज झोन क्षेत्रासह राज्यातील सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना ३० मे पर्यंत सर्व बस फिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जास्तीत जास्त ३० प्रवाशांना सामाजिक अंतराचे अनुसरण करत बसमध्ये बसण्यात येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -