घरमहाराष्ट्रअकोल्यात शिवशाही बस आणि ट्रेलरमध्ये अपघात; २५ प्रवासी गंभीर जखमी

अकोल्यात शिवशाही बस आणि ट्रेलरमध्ये अपघात; २५ प्रवासी गंभीर जखमी

Subscribe

अकोला जिल्ह्यातल्या नवसारी फाट्यावर सकाळी शिवशाही बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी

अकोलामध्ये शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. अकोला जिल्ह्यातल्या नवसारी फाट्यावर ही घटना घडली आहे. बस आणि ट्रेलची धडक झाली असून या अपघातामध्ये २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर यामध्ये बस चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींना अमरावीत येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अशी घडली घटना

मुंबई- कोलकाता नॅशल हायवे क्रमांक ६ वर आज सकाळी अपघात झाला. अकोला जिल्ह्यातल्या नवसारी फाट्यावर सकाळी शिवशाही बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या ट्रेलरमध्ये लोखंडांचे पाईप होते हे पाईप शिवशाही बसमध्ये घुसले. या अपघातामध्ये २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यामधील ५ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु

अपघाताची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. बसमधील जखमी प्रवाशांना काढून अमरावती येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघात ऐवढा भीषण होता की अपघातामध्ये ट्रेलरमधील लोखंडी पाईप शिवशाही बसमध्ये घुसल्यामुळे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर हायवेवर ट्राफिक जाम झाले आहेत. वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. या अपघाताचा तपास देखील पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -