घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: कोरोनाची चाचणी होणार फक्त ५ मिनिटांत!

CoronaVirus: कोरोनाची चाचणी होणार फक्त ५ मिनिटांत!

Subscribe

अवघ्या पाच मिनिटांमध्ये व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की नाही ? हे होणार स्पष्ट

राज्यभरासह देशभरात दिवसेंदिवस थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. देशात कोरोना व्हायरसच्या बळींचा आकडा एक-एक करत वाढत असल्याने चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र देशात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सॅम्पल्स टेस्ट किटची निर्मिती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या ‘माय लॅब’ डिस्कवरी सोल्युशन्स कंपनीनं संशोधन करुन मेड इन इंडिया टेस्ट किट नुकतेच विकसित केले आहे. या नव्याने विकसित करण्यात आलेल्या टेस्टिंग किटला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थांची मान्यता देखील प्राप्त झाली आहे.

या नव्या किटमुळे अवघ्या पाच मिनिटांमध्ये व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की नाही ? हे स्पष्ट होणार असून वजनाने हलके आहे. अमेरिकेत असणाऱ्या प्रयोगशाळेत याचा प्रयोग यशस्वी देखील झाला आहे. काही दिवसात हे नव्याने विकसित झालेले किट जनतेसमोर आणण्याची मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी अन्न आणि औषध विभागाकडून मिळाल्याचे अमेरिकेच्या एबॉट प्रयोगशाळेने सांगितले आहे.

- Advertisement -

दिवसाला १००० नमुन्यांची तपासणी शक्य

पुण्यात असणाऱ्या या लॅबकडे एका आठवड्यात साधारण एक लाख किट्स बनवण्याची क्षमता आहे. या नव्याने विकसित करण्यात किटमध्ये एकावेळी १०० टेस्ट होणार आहेत. एका लॅबमध्ये दिवसाला १००० नमुन्यांची तपासणी करता येणं शक्य होणार आहे. या किटची किंमत साधारण परदेशातून येणाऱ्या किटसच्या तुलनेत एक चतुर्थांश इतकी आहे.आपल्या देशात ही टेस्टिंग किटस जर्मनी मधून मागवली जात होती. दिवसाला केल्या जाणाऱ्या या टेस्टच्या संख्येत भारत खूर मागे असला तरी माय लॅबच्या या संशोधनामुळे कोरोना विरूद्ध असणाऱ्या लढाईत मोठं यश म्हणता येईल.


Coronavirus: कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरीही व्हायरस शरीरात राहतो?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -