‘मी पुन्हा येईन’ आमिर खानचे बारामतीमध्ये वक्तव्य

Amir khan

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेला अमिर खानने सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी अमिक खानने कृषिक’ या प्रदर्शनाचे तोंड भरून कौतूक केलं. त्याचबरोबर हे मोठं काम एका दिवसात बघून होणार नाही, त्यामुळे हे सगळं शिकायला ४ दिवस तरी बारामतीत येण्याची तयारी दाखवली.

अभिनेता अमिर खान हा सामाजिक क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटवत असतो. सत्यमेव जयते, पाणी फाऊंडेशनच्या कामातून तो सतत सामाजिक बांधिलकी जपतो. पाणी फाऊंडशेनने आजपर्यंत अनेक गावात पाण्याचा मोठा प्रश्न सोडवला या विषयी बोलताना अमिर म्हणाला, महाराष्ट्रातील अनेक समस्या लक्षात घेता एका समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पाणी ही महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाची समस्या असल्याचं लक्षात आलं. आणि पाण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. खरतर हे काम शेतकऱ्यांचे आहे आम्ही फक्त मार्ग दाखवला. पाण्याबरोबरच कृषी क्षेत्रातही कशी प्रगती होईल याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. असे अमिर म्हणाला.

गेल्या काही वर्षापासून शिक्षणासाठीही काम करत आहोत. लहानमुलांमध्ये शिक्षणाविषयी, पर्यावरणाविषयी, कृषी क्षेत्राविषयी गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असं आमीर खान शिक्षणाविषयी बोलताना म्हणाला.

त्याचबरोबर या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे अमिरने खूप कौतूक केले. गेले काही वर्ष इथे येण्याची इच्छा होती, पण या निमित्ताने यायला मिळाल्याचे अमिर म्हणाला. त्याचप्रमाणे इथलं हे मोठं कार्य एका दिवसात न शिकता आणखी ४ दिवस इथे येण्याची आणि शिकण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली.