घरमहाराष्ट्रमहापौरांसमोरच अतिरिक्त आयुक्तांना मारहाण

महापौरांसमोरच अतिरिक्त आयुक्तांना मारहाण

Subscribe

पुण्यात अतिरिक्त आयुक्त असलेल्या राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांसमोरच बेदम मारहाण करण्यात आली. नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून महापौर दालनात हे कृत्य करण्यात आले. जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. महापालिकेमध्ये दुपारच्या सुमारास अशाप्रकारची घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

जलपर्णी गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापौर दालनात ठिय्या आंदोलन केले. ‘दोषी अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांकडे केली. ज्यांनी निविदा काढल्या त्यांच्याकडून खुलासा नको, अधिकारी चोर आहेत अशा घोषणाही कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर त्याठिकाणी उपस्थित होते.

- Advertisement -

नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांनी निंबाळकर यांना जलपर्णीच्या विषयाबाबत काही प्रश्न विचारले. त्यांनी दिलेल्या उत्तराने संबंधितांचे समाधान न झाल्याने त्यावर वाद निर्माण झाला. यावेळी नगरसेवकांसोबत उपस्थित असणार्‍या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘अधिकारी चोर आहेत’ असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्यावर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर म्हणाले, हे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नसून तुमची काय लायकी आहे. या सर्व वादावर बोलताना,अतिरिक्त आयुक्तांचे विधान योग्य नसून संबंधित निविदेची २४ तासांत चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -