घरमहाराष्ट्रभाजप सोडून विजय घोटमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप सोडून विजय घोटमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Subscribe

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत असताना भाजपचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत असताना राष्ट्रवादीने देखील भाजपला जोरदार धक्का दिला आहे. विजय घोटमारे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. यावेळी माजी मंत्री रमेश बंब, नागपूरचे ग्रामीण कार्याध्यक्ष राजू राऊत, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे उपस्थित होते.

हेही वाचा – आदित्य ठाकरे यांच्या नावाने डिलिव्हरी बॉयचा ‘मातोश्री’च्या कर्मचाऱ्यांना गंडा

- Advertisement -

राष्ट्रवादीला मोठा धक्का; उदयनराजेंचा भाजप प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उदयनराजे साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व होते. याशिवाय महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या मोजक्या चार खासदारांपैकी ते एक होते. आज त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे फार मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात गेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने देखील हार पत्कारलेली दिसत नाही. कारण, भाजपचे हिंगोलीचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -