घरमहाराष्ट्र'मी आमदार असताना मुख्यमंत्री हाफ चड्डीत फिरत होते'

‘मी आमदार असताना मुख्यमंत्री हाफ चड्डीत फिरत होते’

Subscribe

भाजप-सेना पक्ष केडर बेस असून त्यांनी आमचे किती तरी उमेदवार पळवले. यांचे पोरं पळव त्यांचे पोरं पळव ही भाजपची नीती असल्याची टीका भुजबळांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. १९८५ ला मी आमदार आणि महापौर होतो. त्यावेळी मुख्यमंत्री अर्ध्या चड्डीत फिरत होते. आता त्यांना विचारुन मी भाषण करु का? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. माझी चूक नसताना मला तुरुंगात टाकले आता मुख्यमंत्री मला धमकी देतात. मी सध्या जामीनावर बाहेर आहे. यांना विचारुन मी भाषण करायचे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पोरं पळवणे भाजपची नीती

श्रीगोंदा येथे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांवरच नाही तर विखे-पाटलांवर देखील टीका केली आहे. भाजप-सेना पक्ष केडर बेस असून त्यांनी आमचे किती तरी उमेदवार पळवले. यांचे पोरं पळव त्यांचे पोरं पळव ही भाजपची नीती असल्याची टीका भुजबळांनी केली आहे. विखे-पाटील सगळ्या पक्षात जाण्याचा इतिहास पुढे चालवत आहेत. सुजयला राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची संधी होती मात्र त्यांना भाजप चालले मात्र राष्ट्रवादीचे घड्याळा चालत नव्हते अशी टीका भुजबळांनी केली आहे.

- Advertisement -

कुलभूषणला का सोडवून आणले नाही?

दरम्यान, लोकमत आघाडीच्या बाजुने असल्याचा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. पुलवामा प्रकरणात जवान शहीद झाले हे मोदी सरकारचे पाप आहे. अभिनंदनला सोडण्यावर मोदी ५६ इंची छाती फुगवतात मग, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून का सोडवून आणले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बिगर निमंत्रणाचे पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाणाऱ्यांनी कशाला देशप्रेमाच्या गप्पा माराव्यात?, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -