ठाकरे सरकार गोंधळलेलं सरकार; वीजबिलावरुन चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

chandrakant patil and uddhav thackeray

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाढीव वीजबिलावरुन राज्यातील ठाकरे सरकार टीकास्त्र सोडले आहे. सरकारने वीजबिलाचा गोंधळ घातला असून लोकांच्या मनात गैरसमज पसरला आहे. एकूण वीज बिल कमी करणे लांबच राहिले आहे, वाढीव बिले आली त्याचे काय करणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. निवडणुकीपूर्वी वचननाम्यात जे काही सांगितले आहे ते आता विसरले आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हटले.

वाढीव बिलात ३० टक्के कपात करणार असे सरकारने सांगितले. परंतु सरकार केलेली घोषणा सातत्याने बदलत आहे. प्रत्येक मंत्री विरोधाभासी वक्तव्य करतोय. ठाकरे सरकार गोंधळलेले सरकार आहे. सरकारने वीजबिलाचा गोंधळ घातला असून विजबिलासंदर्भात लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे. लोकांच्या सहनशक्तीचा अंत होत चालला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. वाढीव विजबिलासंदर्भात भाजप आंदोलन करणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. आंदोलन करुन सरकारला विज बिले पुन्हा तपासायला भाग पाडू, असे म्हटले.

प्रत्येक वेळी काहीही झाले का केंद्रावर खापर फोडतात. केंद्रावर खापर फोडणे योग्य नाही. राज्य स्वत: च्या ताकदीवर चालवता येत नसेल तर जोडतोड करुन सरकार आणले कशासाठी? काही झाले की केंद्र. यांच्याकडे ताकद नाही आहे का? असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.