घरताज्या घडामोडी'पुस्तक झालं आता व्हिडिओ आला'

‘पुस्तक झालं आता व्हिडिओ आला’

Subscribe

'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे.

‘पुस्तक झालं आता व्हिडिओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय आहे हे सर्व. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. या प्रकरणावर ट्विट करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संभाजी राजे?

‘आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत, यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये’,असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, असं नाव असलेलं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यावरून मोठं वादंग निर्माण झालं. हे वादंग सुरु असतानाच आता पुन्हा एकदा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तान्हाजी या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग करुन शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया

पॉलिटिकल किडा या ट्विटर हँडलवर ही चित्रफित केल्यानंतर त्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. ही चित्रफित तत्काळ मागे घ्यावी अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील, अशा शेकडो प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – ‘नाईटलाइफ’च्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणतात…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -