घरमहाराष्ट्रटीव्ही मालिकांमधून मोदी सरकारचा प्रचार; वाहिन्यांविरोधात करणार तक्रार

टीव्ही मालिकांमधून मोदी सरकारचा प्रचार; वाहिन्यांविरोधात करणार तक्रार

Subscribe

भाजप दिवसेंदिवस हीन पातळीवरील राजकारण करत असून दैनंदिन मालिकांचा उपयोग प्रचारासाठी केला जात असल्याचे, ट्विट काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी केले आहे. याप्रकरणी सचिन सावंत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे भाजपचा प्रचार करणाऱ्या या वाहिन्या आणि निर्मिती संस्थांविरोधात तक्रार करणार आहेत.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. तर काही ठिकाणी पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल देखील लढवत आहेत. अशीच शक्कल भाजपने लढवली आहे. भाजप सरकारने आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टीव्ही मालिकांचा आधार घेत आहेत. ‘भाभीजी घर पर है,’ आणि ‘तुझसे है राबता’ या हिंदी मालिकांमधून मोदी सरकारने आपल्या कामांचा प्रचार केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस याविरुद्ध आज, सोमवारी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहेत.

सचिन सावंत यांचे ट्विट

काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी यासंदर्भातलं एक ट्वीट केलं आहे. ‘भाजप दिवसेंदिवस हीन पातळीवरील राजकारण करत आहे. आता दैनंदिन मालिकांचा उपयोग प्रचारासाठी केला जात आहे’, असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच या संदर्भात आज दुपारी अडीच वाजता आपण मुख्य निवडणूक आयुक्तांकडे भाजपचा प्रचार करणाऱ्या या वाहिन्या आणि निर्मिती संस्थांविरोधात तक्रार करणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -