घरमहाराष्ट्र'कालिदास कोळंबकर यांचं ठरलंय' अधिवेशन संपल्यानंतर भाजपात प्रवेश

‘कालिदास कोळंबकर यांचं ठरलंय’ अधिवेशन संपल्यानंतर भाजपात प्रवेश

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे इतर तीन आमदार भाजपामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश करणार अशी चर्चा होती. या आमदारांमध्ये काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचे देखील नाव चर्चेत होते. मात्र माय महानगरच्या प्रतिनिधीशी बोलताना कालिदास कोळंबकर म्हणाले की, “माझं ठरलंय, मी भाजपात जाणार, पण आताच नाही. तर पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपामध्ये जाणार”, असे सांगितले. राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून सुरू होत आहे. फडणवीस सरकारचे हे अंतिम अधिवेशन असून, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर आपण भाजपमध्ये जाऊ, असे कोळंबकर यांनी माय महानगरशी बोलताना सांगितले.

म्हणून सध्या प्रवेश नाही

विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने उरले असताना फक्त घाईघाईत अधिवेशनाच्या आधी पक्ष सोडणे योग्य नाही. त्यामुळे जरी माझे भाजपात जाणे निश्चित झाले असले तरी पावसाळी अधिवेशना नंतर पक्ष प्रवेश करणार असल्याचे कोळंबकर यांनी सांगितले. दरम्यान लोकसभा निवडणुकी दरम्यान कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा प्रचार केला होता. त्यामुळे नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक कालिदास कोळंबकर नेमके शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपात? असा संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच कोळंबकर यांनी देखील आपल्याला शिवसेनेतून ऑफर असल्याचे सांगितले होते. मात्र आता कोळंबकर यांचे ठरले असून, ते भाजपामध्ये प्रवेश करणार असून, अधिवेशनानंतर त्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे.

मी भाजपामध्ये प्रवेश करणार असून, पावसाळी अधिवेशन सपल्यानंतर मी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. – कालिदास कोळंबकर, आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -