घरCORONA UPDATEजलनीती करोनापासून संरक्षण करते- डॉ. धनंजय केळकर

जलनीती करोनापासून संरक्षण करते- डॉ. धनंजय केळकर

Subscribe

पुण्याचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आज देशातील करोना आजारावर प्रभावी उपचार करण्यात आघाडीवर आहे. आज मोठ्या संख्येने करोनाबाधित रुग्ण तेथे उपचारासाठी येत आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात ८०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. करोना रुग्णांवर या ठिकाणी ३०० डॉक्टरसह ४५०० कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र यापैकी फक्त २४ डॉक्टरांना करोनाची प्राथमिक लागण झाली असून तेसुद्धा यातून लवकर बाहेर येतील. एवढ्या मोठ्या डॉक्टर आणि कर्मचारी हजारो रुग्णांवर उपचार करत असताना मंगेशकर हॉस्पिटलने करोनावर विजय मिळवला याचे मुख्य कारण म्हणजे जलनीतीचा वापर. आयुर्वेद परंपरेत सांगितलेल्या या जलनीतीचा वापर करून आपल्या सर्वांना करोनापासून संरक्षण करता येते. ही जलनीती करोना बरा करत नाही, पण तुम्हाला त्याची लागण होण्यापासून संरक्षित करते, असा विश्वास मंगेशकर हॉस्पिटलचे डिन डॉ. धनंजय केळकर यांनी व्यक्त केला.

डॉ. केळकर हे एमएस असून आधी ते पुण्यात संजीवनी हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळत होते. पण, त्यांच्या हाती मंगेशकर हॉस्पिटलची व्यवस्था हाती आल्यानंतर त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी या हॉस्पिटलला नावारूपाला आणले आहे. मंगेशकर कुटुंबाचा पाठिंबा आणि केळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने केलेले अथक प्रयत्न यामुळे मंगेशकर हॉस्पिटलने राज्यात स्वतःच्या नावाचे एक वेगळे अस्तित्व तयार केले आहे. हेच वेगळेपण आज करोनाच्या महासंकटात उठून दिसले आहे. खासगी हॉस्पिटल करोना पासून स्वतःला दूर ठेवत असताना या संकटकाळात मंगेशकर हॉस्पिटल मात्र कोविड योद्ध्याप्रमाणे लढत आहे आणि अर्थातच डॉ. केळकर यात सेनापतीची भूमिका बजावताना दिसत आहेत.

- Advertisement -

‘करोना उपचाराचे बरेच समज गैरसमज आहेत. पण, आम्ही करोना रुग्णांवर उपचार करताना आधी आमच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेतो. ही काळजी घेतली की रुग्णांवर उपचार करण्यासाठी जी शारीरिक आणि मानसिक ताकद लागते ती आम्हाला मिळते. जलनीतीचा वापर करा, असे आम्हीच आमच्या डॉक्टरांना सुरुवातीपासून सांगत होतो. अतिशय सोपा उपाय आहे. बऱ्याच जणांनी तो मानला, काहींनी तो मानला नाही. शेवटी काही वेगळे प्रयोग करणे हे आपण सांगू शकतो, त्याची जबरदस्ती करू शकत नाही. यापैकी २२ डॉक्टरांना लागण झाली. पण ते बरे होतील. ही जलनीती तुमचे संरक्षण करते’, असे डॉ. केळकर सांगतात.

‘जलनीती करण्यापूर्वी आधी योग प्रकारातील कपालभाती करून घ्यावी. दोन्ही नाक पुड्यांवर बोट ठेवून आधी शरीरातील हवा बाहेर फेकावी. म्हणजे डाव्या आणि उजव्या नाकपुडीवर बोट ठेवून दहा-दहा वेळा हवा बाहेर फेकावी. त्यानंतर दोन्ही हात मोकळे ठेवून दहा वेळा नाकावाटे श्वास बाहेर फेकावा. ते झाल्यानंतर कोमट पाणी एका एका नाकपुडीतून आत सोडावे. करोनाचा प्रभाव हा सकाळी आणि रात्री असतो. त्यामुळे नाक आणि घसा याची काळजी घेताना जलनीतीचा उपयोग करून स्वतःला करोनापासून दूर ठेवता येते’, याकडे डॉ. केळकर लक्ष वेधतात.

- Advertisement -

मी स्वतःवर आधी हा प्रयोग करून मग माझ्या सहकाऱ्यांना सांगितला आहे. जलनीती हा अगदी साधा सोपा उपाय आहे. त्यापासून काही धोका नाही. तुम्हाला तो संरक्षित करतो, असे सांगताना करोनाबाधित रुग्णांना डॉ. केळकर आधार देतात, ‘आजार होऊ नये यासाठी आधी आपली काळजी घ्या आणि झाला तर घाबरून जाऊ नका. तातडीने उपचार घ्या. करोना झाला म्हणजे सर्व संपले नाही. बधितांची संख्या लक्षात घेता मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. आमच्या मंगेशकर हॉस्पिटमधील माझ्या सहकाऱ्यांनी जलनीती वापरून करोनाला दूर ठेवले आहे. तुम्ही सुद्धा ठेवू शकता’.

हेही वाचा –

लालबागचा राजा मंडळाचा मोठा निर्णय; यंदा गणेशोत्सव होणार नाही

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -