घरमहाराष्ट्रदिंडोरी तालुक्यात बिबटयाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

दिंडोरी तालुक्यात बिबटयाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Subscribe

दिंडोरीत तालुक्यातील मातेरेवाडी गावात देविदास जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये जाधव यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दिंडोरीत तालुक्यातील मातेरेवाडी गावात देविदास जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेनंतर मातेरेवाडी गावातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

कसा घडला प्रकार

दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी गावात राहणारे जाधव हे आपल्या शेतात सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीची मोटार चालू करण्यास गेले असतात बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने जाधव ह्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या नंतर दोघांमध्ये झटपट झाली आणि ह्यात जाधव ह्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. हल्यादरम्यान जाधव यांचा ओरडण्याचा आवाज ऐकवून घरच्यांनी धाव घेतल्याने बिबट्याने पुन्हा शेतात धूम ठोकली, जाधव ह्यांनी थंडी असल्याने गळ्यात मफलर घातल्याने मी बचावलो असल्याचं जाधव ह्यांनी सागितलं.

- Advertisement -

लोकांमध्ये भितीचे वातावरण

सुरवातीला त्यांच्या वर दिंडोरी च्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले,मात्र गालावरची जखम खोलवर असल्याने त्यानां नाशिकचे प्रसिद्ध स्किन स्पेशलिस्ट डॉ राजेंद्र नेहते ह्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. दिंडोरी तालुक्यात मोठया प्रमाणात उसाची शेती असल्याने बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ह्या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून ह्या भागात बिबट्यानां जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -