दिवीपारंगीत श्री जाखमाता देवीचा उत्सव

Mumbai
श्री जाखमाता देवी उत्सव

तालुक्यातील दिवीपारंगी गावचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जाखमाता देवीचा त्रैवार्षिक उत्सव रविवार 21 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. दोन वर्षांतून एकदा श्री हनुमान जयंतीनंतर दोन ते तीन दिवसांनी येणारा हा उत्सव ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात. पहाटे 4.30 वाजल्यापासून काकड आरतीने उत्सवाला सुरूवात होते. त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत भजन कार्यक्रम चालू असतात.

उत्सवानिमित्त यात्राही भरते, तर दुपारी 2 वाजता पालखी मिरवणूक निघते. सोबत अनेक वारकरी, भजने, टिमकिवाले, बॅन्जोपथके, तसेच या पालखीसोबत विविध वेशभूषा, चित्ररथातील देखावे, दांडपट्ट्यांचा खेळ, ऐतिहासिक खेळ, बहुरूपी अशा प्रकारची शोभायात्रा निघते. पालखीची मिरवणूक शेजारी असलेल्या समुद्राजवळ येते आणि लाखो भाविकांसमोर देवीचा लाकडी पाट समुद्रात सोडला जातो आणि पुन्हा तोच पाट सकाळी त्याच जागेवर येतो. हे पाहण्यासाठी काही भाविक दुसर्‍या दिवशी सकाळी समुद्रकिनारी हजर राहतात. अनेक वर्षांची परंपरा दिवीपारंगी येथील ग्रामस्थांनी अजूनही जपली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here