Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र काळजात धडकी भरवणारी घटना! भंडाऱ्यातील अग्नितांडवात दहा नवजात बालकांचा मृत्यू

काळजात धडकी भरवणारी घटना! भंडाऱ्यातील अग्नितांडवात दहा नवजात बालकांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज मध्यरात्री दोनच्या सुमारा ही आग लागली. शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालकं होती. यापैकी ७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बॉर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या”, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक

- Advertisement -

भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अग्नीतांडवात १० बालकांचा मृत्यू झाला. मात्र, या आई किंवा अन्य नातेवाईकांना आपल्या बाळाला पाहू दिलेलं नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच बाळांच्या आई आणि नातेवाईक आक्रोश करत असल्याचं अत्यंत दु:खद चित्र भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आहे.

- Advertisement -