घरमहाराष्ट्रपाडवा स्पेशल : 'या' पाच परंपरेनुसार साजरा करतात गुढीपाडावा

पाडवा स्पेशल : ‘या’ पाच परंपरेनुसार साजरा करतात गुढीपाडावा

Subscribe

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजारा केला जातो. गुढीपाडवा साजराकरताना पाळल्या जाणाऱ्या पाच परंपरेने साजरा केला जातो.

भारतीय सण हे आपल्या समुद्ध परंपरेचे प्रतीक आहे. गुढीपाडवा या सणांने नववर्षाची सुरूवात होते. गुढपाडवा भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक घराबाहेर दारासमोर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यांमध्ये उगादी, चेटी चांद अशा वेगवेगळ्या नावानी आणि पद्धतींनी साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. तर हा सण विशिष्ट परंपरेने साजरा केला जातो.

पवित्र स्नान

गुढीपाडवा किंवा संवत्सर पाडवो अभ्यंगस्नान केले जाते. आंघोळी नंतर नवेकोरे कपडे परिधान केले जातात. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये महिला पारंपारिक पोशाखामध्ये ‘साडी’ घालतात. तर पुरूष मंडळी कुर्ता आणि पायजमा तर लाल किंवा केशरी फेटा घालतात.

- Advertisement -

पारंपारिक रांगोळी

महिलावर्ग सकाळी पवित्र स्नान घेऊन पहिल्यांदा घराच्या अंगण्यात रांगोळी काढतात. तर ती रांगोळी तांदळाचे पिठ, कुंकु आणि हळद एकत्र करून रांगोळी काढतात. मात्र, आज रांगोळी काढण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. आता रांगोळी फुल आणि मेळबत्यांच्या रोशनायीने रांगोळी आकर्षित बनवतात. रांगोळी काढण्याचा उद्देश मात्र एकच असतो की, नकारात्मक ऊर्जा घालवून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हा असतो.

फुलांची सजावट

दिवाळी, दसरासारखे सण जसा फुलांशिवाय साजरा होऊ शकत नाही. त्याच प्रमाणे गुढीपाडवा हा सणसुद्धा फुलांशिवाय अपूर्ण आहे. दारासमोर उभी करणाऱ्या गुढीलाही तसेच दारालाही वेगवेगळ्या फुलांने सजवले जाते. फुल ही सकारात्मक ऊर्जा सर्वतोपर पसरवते. तर फूल हा पवित्रतेचे दर्शन घडविते.

- Advertisement -

गुढी

गुढीपाडव्याला प्रत्येक घरा बाहेर लांब बांबूच्या काडीला रेशमी कापडा त्यावर ताब्यां ठेवतात. तर त्याला फुलाच्या हरानी सजवले जाते. तसेच साखरेची माळसुद्धी घातली जाते. त्यानंतर पाटा खाली स्वस्तिकची रांगोळी काढून गुढी पाटावर उभी केली जाते.

प्रसाद

बहुतेक वेळा भारतीय सणात गोड पदार्थ प्रसादासाठी तयार केला जातो. मात्र, गुढीपाडवा असा सण आहे की, या सणाात कडुलिंबाचे पान आणि गुळ एकत्र करून प्रसादाला ठेवले जाते. कडू आणि गोड स्वादाचा असणारा हा प्रसाद म्हणजेच आयुष्यात येणारे आनंद आणि दु:ख होय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -