घरमहाराष्ट्रसिनेमांच्या तिकिटांपेक्षा पॉपकॉर्न महाग

सिनेमांच्या तिकिटांपेक्षा पॉपकॉर्न महाग

Subscribe

इंटरवल झाला की, सिनेमागृहाबाहेर पडत मस्त गरमगरम, वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पॉपकॉर्न स्टॉलकडे आपली पावलं आपसुकचं वळतात. पण हल्ली मात्र सिनेमाप्रेमी पॉपकॉर्न घेताना नाकं मुरडत आहेत. कारण सिनेमाच्या तिकिटांपेक्षाही महाग दरात या इंटरवलमधला खाऊ विकला जात आहे.

थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला सगळ्यांनाच आवडतं. शिवाय सिनेमा आणखी एन्जॉय करण्यासाठी सोबत पॉपकॉर्न, समोसा, नॅचोज चिप्स, कोल्डड्रिंक असं काही खायला मिळालं तर मग तो सिनेमा बघायला मजा येते. यासाठी अनेकजण इंटरवलची वाट बघत असतात. इंटरवल झाला की, सिनेमागृहाबाहेर पडत मस्त गरमगरम, वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पॉपकॉर्न स्टॉलकडे आपली पावलं आपसुकचं वळतात. पण हल्ली मात्र सिनेमाप्रेमी पॉपकॉर्न घेताना नाकं मुरडत आहेत. कारण सिनेमाच्या तिकिटांपेक्षाही महाग दरात या इंटरवलमधला खाऊ विकला जात आहे.

नेमकं काय झालं ?

मुंबई हायकोर्टात सिनेमागृहांमध्ये मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. बुधवारी सुनावणीदरम्यान मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दरासंदर्भात राज्यसरकारशी विचारणा केल्यावर मल्टीप्लेक्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरासंदर्भात काही नियम नसल्याचे सांगितले. या आधी सिनेमागृहांमध्ये बाहेरुन आणलेले खाद्यपदार्थ आत नेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण सुरक्षेचे कारण पुढे करत मल्टीप्लेक्सवाल्यांनी याला विरोध केला होता. आता हे पदार्थ सिनेमाच्या तिकिटापेक्षाही महाग असतात, असे या याचिकेत नमूद करण्यात आले होते. त्याविषयी मल्टीप्लेक्सकडून त्यांची भूमिका सादर करण्यात आली. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील कोणत्याही पदार्थांच्या दरावर आक्षेप घेतला जात नाही, मग थिएटरमध्येच का? शिवाय कोणालाही या ठिकाणी खाद्यपदार्थ घेणे अनिवार्य केलेले नाही. त्यामुळे प्रश्न उद्धवतच नाही. शिवाय मल्टिप्लेक्स हे खाजगी क्षेत्र असल्यामुळे दराचा निर्णय हा सर्वस्वी मल्टिप्लेक्स मालकांचा आहे. दरम्यान या दरांसंदर्भात नियम बसवू शकत नाही का ? असे मुंबई सरकारने राज्य सरकारलाही विचारले आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया

सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास परवानगी देण्याविषयीची याचिका दाखल झाली होती. त्याला अनेकांनी पाठिंबा दिला. पण मल्टिप्लेक्समधील सुरक्षेच्या कारणास्तव त्या विषयावर तसा पडदाच पडला. त्यानंतर आता या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दराचाही अनेकांना फटका बसत आहे. एका सोशल ब्लॉगरने या संदर्भातला एक व्हिडिओ फेसबुकवरुन शेअर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -