घरमहाराष्ट्रफेसबुक लाईव्ह करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

फेसबुक लाईव्ह करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

लातूरमध्ये एका तरुणीने फेसबुक लाईव्ह केले आणि या फेसबुक लाईव्हमध्ये तिने गुडनाईटचे लिक्विड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

नैराश्यमध्ये त्रस्त झालेले लोक बऱ्याचदा आयुष्य संपवण्याची गोष्टी करताना दिसतात. आत्महत्या करण्यापुर्वी ते दोन-चार जवळच्या लोकांकडेही बोलून दाखवतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे काही लोक आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर यासंबंधी लिहितात आणि मग आत्महत्या करतात. अशा बऱ्याच घटना आतापर्यंत घडून गेल्या आहेत. अशाच एका घटनेची पुनरावृत्ती लातूरमध्ये घडली आहे. लातूरमध्ये एका तरुणीने फेसबुक लाईव्ह केले आणि या फेसबुक लाईव्हमध्ये तिने गुडनाईटचे लिक्विड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

हेही वाचा – हेअरस्टाईल बिघडली म्हणून मुलीने संपवले आयुष्य

- Advertisement -

का केला आत्महत्येचा प्रयत्न?

आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरुणी ही पॅंथर सेनेची पदाधिकारी आहे. परंतु, तिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तिने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतरही काही लोक तिला त्रास देत होते. त्यामुळे या लोकांच्या त्रासाला वैतागून आणि चिडून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिचा फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच तरुणीचे घर गाठले. परंतु, तोपर्यंत तरुणी गुडनाईटचे लिक्विड प्यायली होती. या तरुणीला पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. याविषयी पोलीस पुढील तपास घेत आहेत. दरम्यान तरुणीचा फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ सगळीकडे पसरताच पोलिसांनी त्या व्हिडिओची लिंक काढली आहे. त्यामुळे तरुणीच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ आता दिसत नाही.

सोशल मिडीयातून या आधी घडलेल्या आत्महत्येच्या घटना

या आधी देखील काही तरुणांने सोशल मिडीयातून आत्महत्या केल्याच्या घटना
मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या.

  • कांदिवलीतील एका पंधरा वर्षीय मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी त्या मुलाने इंस्टाग्रामवरून माफी मागणारी पोस्ट टाकली होती. हा तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेला होता. सतत फोनवर बोलणे व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे त्याची आई त्याला ओरडली होती. त्याच रागातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
  • नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करुन गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
  • जळगाव येथील मुबारक तडवी (४५) या शेतकऱ्यांने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी तडवी यांनी आपण आत्महत्या करीत असल्याचा संदेश आणि सुसाईड नोट सोशल मीडियावर टाकली होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -