घरदेश-विदेशसोने पोहोचले ४० हजारांवर

सोने पोहोचले ४० हजारांवर

Subscribe

जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याचा परिणाम

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वेगाने वाढ होत आहे. सोमवारी बाजारात सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली. दहा ग्रॅम सोन्याचा दर ४० हजार रुपयांच्यावर (जीएसटीसह) पोहोचला आहे. जीएसटी वगळून सोन्याचा दर सोमवारी ३९ हजार १८० रुपये होता. पहिल्यांदाच सोन्याचा दर 39 हजारांच्या पुढे गेला आहे. एका दिवसात सोन्याच्या किमतीत 350 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली होती. डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत कमी झाल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

शुक्रवारी सोन्याचा दर 38 हजार 995 रुपयांवर पोहचला होता.सणासुदीला सोन्याचे दर वाढल्याने आता खरेदीवर याचा परिणाम होऊ शकतो. गणपतीचा सण तोंडावर आला असताना मुंबईत जीएसटीसह सोन्याचे दर 40 हजारांवर पोहचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

- Advertisement -

दिल्लीत सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर 25 रुपयांनी वाढून 38 हजार 995 रुपयांवर स्थिरावला होता. गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे अखिल भारतीय सराफ संघाने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या बदलांचा परिणाम देशातील स्थानिक बाजारात होण्याची शक्यता आहे. या आठवड्यातच सोने 40 हजारांच्या पुढे जाऊ शकते. जर आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणखी बदलले तर येत्या 2 ते 3 आठवड्यात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात.

- Advertisement -

गेल्या वर्षी २ ऑगस्ट २०१८ रोजी ३० हजार २०० रुपयांवर असलेले सोने या वर्षी ऑगस्ट महिन्यात 40 हजाराच्या पुढे गेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची वाढलेली खरेदी व दुसरीकडे भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात वाढ होत आहे. सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव वाढत जाऊन वर्षभरात सोने तब्बल 9 हजार रुपये प्रती तोळा तर चांदी साडेतीन हजार रुपये प्रती किलोने महागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -