घरमहाराष्ट्रगुटखा वाहतूक केल्यास वाहन परवाना रद्द

गुटखा वाहतूक केल्यास वाहन परवाना रद्द

Subscribe

राज्यात गुटखा बंदी असली तरीही राज्याच्या सीमाभागातून चोरी छुप्या मार्गाने गुटखा आणून विक्री केली जाते. त्यामुळे, गुटख्याची वाहतूक राज्यात केल्यास त्या वाहनाचा परवाना रद्द करुन वाहकाला निलंबित करण्यात येईल, असे परिपत्रकच अन्न आणि औषध प्रशासनाकडून काढण्यात आलं असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

राज्यात गुटखा बंदी असली तरीही राज्याच्या सीमाभागातून चोरी छुप्या मार्गाने गुटखा आणून विक्री केली जाते. त्यामुळे, गुटख्याची वाहतूक राज्यात केल्यास त्या वाहनाचा परवाना रद्द करुन वाहकाला निलंबित करण्यात येईल, असे परिपत्रकच अन्न आणि औषध प्रशासनाकडून काढण्यात आलं असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. राज्याने प्रतिबंधात्मक आदेश काढल्यानंतर बाजूच्या राज्यांनी देखील गुटखा या पदार्थांवर प्रतिबंध केला आहे. इतर राज्यांमध्ये पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी या पदार्थांच्या उत्पादन आणि विक्रीत बंदी नाही. त्यामुळे, महाराष्ट्रात छुप्या मार्गाने गुटख्याची वाहतूक करुन विक्री केली जाते.

पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक कायमची थांबावी म्हणून प्रशासनाकडून वाहनाचा वाहतुकीचा परवाना तसेच वाहन चालकाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करताना ४३८ वाहने पकडली असून परिवहन विभागाकडे वाहनाचा आणि वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्यासाठी ३७८ प्रस्ताव सादर केले गेले. तर, ९ वाहनाचा आणि वाहनचालकाचा परवाना परिवहन विभागाकडून निलंबित करण्यात आला आहे.

- Advertisement -

२२६ कोटी किंमतीचा गुटखा जप्त –

राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत एकुण सुमारे २२६ कोटी ५३ लाख किंमतीचा गुटखा आणि तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे. ४ हजार ७८२ प्रकरणी राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोषीं विरुद्ध राज्यातील विविध न्यायालयात एकुण ६ हजार २०६ खटले दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, काही तंबाखूजन्य उत्पादने, अल्कोहोलिक उत्पादने उत्पादकांचे लोगो वापरुन विक्री करतात. अशा छुप्या पद्धतीने जनतेची दिशाभूल करतात. त्यामुळे, या उत्पादनांची नाव आणि लोगो इतर खाद्य पदार्थांना वापरण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यामुळे तंबाखुजन्य उत्पादने, अल्कोहोलिक उत्पादने यांच्या नाव आणि लोगोच्या वापरामुळे सामान्याची दिशाभूल होणार नाही. या विषयावर डॉ. शिंगणे यांनी विशेष लक्ष घातले असून तसा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाला पाठवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -