Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दैव बलवत्तर, काळ आला होता पण

दैव बलवत्तर, काळ आला होता पण

हवेत तरंगत असलेल्या माथेरान घाटात जिप्सी कारचा थरार

Related Story

- Advertisement -

माथेरान घाटात दोन फूट असणाऱ्या सुरक्षा कठड्यावर एक जिप्सी कार हवेत तरंगत असतांनाच थरारक चित्र समोर आलं आहे. माथेरान घाटातील वॉटरपाईप स्टेशनच्या वरच्या अवघड चढणीला हा अपघात झाला आहे. या गाडीत नऊ प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून पुढील मोठी दुर्घटना टळली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, MH 03 6565 महाराष्ट्र पासिंग असलेली ही जिप्सी कार मुंबईहून माथेरान फिरण्यासाठी नेरळ येथे आली होती. या वाहनासोबत आणखी काही वाहने (फॅमिली) सोबत असल्याचे समजते. नेरळ येथून माथेरानचा अवघड घाट चढण्यासाठी वाहनचालक स्पीडमध्ये असल्याचे समोर आले आहे. माथेरान मिनी ट्रेनच असलेले वॉटरपाईप स्टेशनच्या वरचा अवघड चढणीला, वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, वाहन खोल दरीच्या बाजूला असलेली लोखंडी ग्रील तोडून सिमेंट क्रॉक्रिटचा दोन फूट उंच सुरक्षा कठड्यावर चढून कार हवेत तरंगत बंद पडली होती. हे चित्र एवढे भयानक होते की, एखाद्या सिनेमामधील सीन वाटावा तसे. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून पुढील मोठी दुर्घटना होता टळली आहे. या वाहनात घरातील महिला वर्ग देखील सोबत असलेली माहिती समोर आली आहे. या कुटुंबावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच काहीसं म्हणायला हरकत नाही.


- Advertisement -

हेही वाचा – राज्यात २६ जानेवारीपासून सुरु होणार ‘कारागृह पर्यटन’


 

- Advertisement -