घरCORONA UPDATECorona: दिलासादायक! पुण्यात बरे होणाऱ्यांची संख्या निम्म्यावर

Corona: दिलासादायक! पुण्यात बरे होणाऱ्यांची संख्या निम्म्यावर

Subscribe

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या ६ हजार ८७९ झाली असून दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. आतापर्यंत पुण्यात ३ हजार ६६१ जण कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. अॅक्टीव्ह रुग्णसंख्या २ हजार ९१२ असून पुणे जिल्हयात एकूण ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १८० रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले. गुरुवारी पुणे शहरात ३१८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर २०५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दिवसभरात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊननंतरही लोकल प्रवास नकोच!

राज्यात कोरोनाचा कहर वाढला 

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज दिवसभरात राज्यात २५९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५९ हजार ५४६ झाली आहे. त्यापैकी १८ हजार ६१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज दिवसभरात ६९८ रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८ हजार ९३९ इतकी झाली आहे. त्याशिवाय, आज दिवसभरात राज्यात ८५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ९८२ इतकी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -