घरमहाराष्ट्रएल्गार परिषद : जामीन अर्जासाठी सोमवारी सुनावणी

एल्गार परिषद : जामीन अर्जासाठी सोमवारी सुनावणी

Subscribe

एल्गार परिषदेच्या खटल्यात अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या जामीन अर्जावर २६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अन्य संशयितांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

एल्गार परिषदेच्या खटल्यात अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या जामीन अर्जावर २६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. यासंदर्भाची माहिती बचाव पक्षाच्या वकिलांनी दिली आहे. रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि महेश राऊत अशी एल्गार परिषदेच्या खटल्यात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्यांच्या जामीन अर्जावर २६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील राहुल देशमुख यांनी दिली आहे. वरवरा राव यांना न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एल्गार परिषदेसंदर्भातल्या सर्व प्रकरणांची सुनावणी २६ नोव्हेंबरला होणार आहे. तपासादरम्यान वरवरा राव यांच्याकडून महत्वपुर्ण माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे अन्य संशयितांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुदतावाढीची केली होती मागणी

भीमा-कोरेगाव प्रकरणी माओवाद्यांशी संबध असल्याचा आरोप करत पाच संशयितांना अटक करण्यात आली होती. या पाचही संशयितांच्या विरोधात तपास करुन आरोपपत्र दाखल करण्यासाठी आम्हाला आणखी ९० दिवसांची मुदत मिळावी, असा अर्ज पुणे पोलिसांकडून २ सप्टेंबरला दाखल केला होता. दरम्यान, सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी हा अर्ज मंजूर केला. संशयित आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती.

- Advertisement -

तपास एनआयएकडे द्यावा

पुणे पोलिसांनी आज हे आरोपपत्र या प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्यासमोर सादर केले. दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांचा नसून तो एनआयएकडे देण्यात यावा अशी मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेमध्ये अधिकार नसताना तपास केला म्हणून तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. चुकीच्या व्यक्तीने तपास केला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे शिवाजी पवार यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -