घरमहाराष्ट्रसक्तीची कर्जवसुली थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

सक्तीची कर्जवसुली थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

Subscribe

बँकेकडून होणाऱ्या सक्तीची कर्जवसुली थांबवावी असे आवाहन नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

आधीच दुष्काळामुळे पिचलेल्या बळीराजाला कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनांतूनही केवळ गारजच दाखविण्यात आले. पाण्याभावी पिके जळून गेली. त्यांना भावही मिळाला नसल्याने आर्थिक विवंचनेत अडकलेल्या बळीराजाला आता बँकांकडूनच सक्तीने कर्ज वसूलीच्या नोटीसा धाडत त्यांच्या अडचणींत अधिक वाढ केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार यंदाच्या दुष्काळात तरी थांबवावा, असे आवाहन नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केले.

या कारणामुळे परफेड करू शकत नाहीत

यंदा कमी पडलेल्या पावसामुळे धरणे, तलावांत पाणी कमी साठले. विहीरी बोअरवेलही हिवाळ्यातच कोरड्या झाल्या. त्यामुळे खरिपासह रब्बीसाठी बँकाकडून घेतलेली पिककर्ज, कृषी कर्ज आणि दीर्घ मुदतीची घेतलेल्या कर्जांची परतफेड करता येत नाही. हात उसने घेतलेले कर्जदाराही त्यामुळे तकादा लावत नसताना बँकांनी मात्र मार्चअखेरचे कारण पुढे करत शेतकऱ्यांना कर्ज भऱण्यासाठी थेट नोटीसाच धाडल्या आहेत. आधीच कर्जबाजारीपणामुळे बळीराजा थेट आत्महत्यांचा मार्ग अवलंबित असताना बँकाकडून मात्र कुठलाही सहानुभूतीपुर्वक विचार न करता थेट नोटीसास्त्राचा वापर केला जात असल्याने या शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.

- Advertisement -

बँक ऑफ बडोदाकडून नोटीस

नाशिक तालुक्यातील महिरावणी, पिंपळगाव बहुला, पिंपळगाव गुरुडेश्वर, गणेशगाव, दुडगाव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी विशेषत: पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांना बँक ऑफ बडोदाकडून नोटीसा पाठविण्यात आल्या. त्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन प्रकार कथन केल्यानंतर भुजबळ यांनी खेडकर यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यात दीर्घ मुदतीचे कर्ज भरण्यास शासनाने मुदत वाढ दिली असल्याने आपणही बँकांना याबाबतचे आदेश द्यावेत. अशी विनंती केली. त्यानंतर शेतकऱ्यांनीही खेडकर यांना निवेदन सादर केले. यावेळी सुदाम खांडबहाले, दीपक वाघ, निवृत्ती खांडबहाले अादींंसह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -