घरदेश-विदेशनिवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी भाजप नेत्याचे घर उडवले

निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी भाजप नेत्याचे घर उडवले

Subscribe

नक्षवाद्यांनी बुधवारी रात्री भाजप नेत्याचे घर डायनामाइटने उडवून देण्याचा प्रयत्न केला. स्फोट घडवून आणल्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावर लोकसभा निवडणूकीवर बहिष्कारासंबंधित पत्रकं टाकून गेले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी थेट भाजप नेत्याच्या घराला लक्ष्य केले आहे. बिहारच्या गयामध्ये नक्षलवाद्यांनी जदयूचे माजी आमदार आणि भाजपचे नेते अनुज कुमार सिंह यांच्या घरामध्ये स्फोट घडवून आणला आहे. अनुज कुमार यांचे घर नक्षवाद्यांनी बुधवारी रात्री डायनामाइटने उडवून देण्याचा प्रयत्न केला. स्फोट घडवून आणल्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावर लोकसभा निवडणूकीवर बहिष्कारासंबंधित पत्रकं टाकून गेले आहे. या स्फोटामध्ये जिवितहानी झाली नाही मात्र अनुज कुमार सिंह यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

डायनामाइटचा केला स्फोट

भाजपचे नेते अनुज कुमार सिंह यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबियांना गेल्या काही दिवसापासून नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले होते. बुधवारी रात्री, डुमरियाच्या बोदिबिघाजवळील रस्त्यावरुन मोठ्या संख्येने नक्षलवादी त्याच्या घराच्या दिशेने चालत आहे. घरामध्ये शिरुन नक्षलवाद्यांनी माझ्या घरामध्ये काम करणाऱ्या नोकराला त्यांनी घराबाहेर केले. त्यानंतर त्यांनी डायनामाइट लावून घरामध्ये स्फोट घडवून आणला.

निवडणुकीवर बहिष्कार

महत्वाचे म्हणजे, भाजप नेते अनुद गयामध्ये असलेल्या घरामध्ये राहतात. मात्र कधी-कधी ते पैतृक येथे असलेल्या घरीसुध्दा जातात. या घटनेनंतरची माहिती डुमरिया पोलीस स्टेशन आणि एसएसपींना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. नक्षलवाद्यांनी त्याच्या घरामध्ये लोकसभा निवडणुकीवर बहिष्कारासंदर्भात पत्र फेकले आहेत. त्यामध्ये त्यांनी सामान्य जनतेच्या मुद्द्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -