घरताज्या घडामोडीधक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या; पतीला अटक

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या; पतीला अटक

Subscribe

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने २१ वर्षाच्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केल्याच्या घटना वारंवार घडत असताना, अशीच एक घटना पंढपूर शहरात घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने २१ वर्षाच्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. आज सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नेमके काय घडले?

पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथे पवार कुटुंब राहत होते. आकाश पवार आणि निकिता पवार यांचा सुखाचा संसार सुरु होता. दरम्यान, आकाश याला पत्नी निकिता हिचा संशय येऊ लागला. तो तिच्या चारित्यावर संशय घेऊ लागला. त्याच संशयावरुन आकाशने निकिताच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करुन तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास केला असता पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona: पुणे जिल्ह्यात १३ जुलैपासून लॉकडाऊन; पालकमंत्री अजित पवारांचे आदेश


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -