दुसऱ्या पत्नीवरुन वाद; पतीकडून पत्नीची हत्या

Pimpri Chinchwad
murder image died
प्रातिनिधिक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपी थेट पोलीस ठाण्यात गेला. गुन्ह्याची कबुली देत पत्नीचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बानू हसनसहाब नदाफ (वय ३४) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर हसनसहाब (वय ४१) असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याने काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह केला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद होत असत. यातूनच खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.


हेही वाचा – गुजरात : अपहरण करुन १४ वर्षीय मुलीवर बलात्कार


काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास हसनसहाब आणि पत्नी बानू यांच्यात राहत्या घरात दुसऱ्या पत्नीवरून वाद झाला. यातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी हसनसहाब याने थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, आरोपीने २०११ ला दुसरा विवाह केला होता. यावरून पहिल्या पत्नी बरोबर अनेकदा वाद झाले होते. पहिल्या पत्नीचे तीन मुले आहेत. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.