मोदींना हरविल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही

शरद पवार यांचा निर्धार

Mumbai
Sharad Pawar

मी असेपर्यंत पिकवणार्‍याचाच विचार करणार आहे. शेतकरी व कष्टकरी टिकला पाहिजे. मी अजून म्हातारा झालेलो नाही. मोदींना हरविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मोदी खासदार असतील मात्र पतंप्रधान नसतील, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. येथील शिवाजी महाराज प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार धनराज महाले यांच्यासाठी प्रचारसभा झाली. यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

पिपंळगाव बसंवत येथे झालेल्या पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर पवार बोलतात, हे ऐकण्यासाठी सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. शरद पवार यांनी जिल्ह्यातून पुलोद काळातील सहकार्‍यांची आठवण सांगताना तेव्हा सर्वच उमेदवार विजयी केल्याचे नमूद केले. नाशिक जिल्ह्याने आपल्यावर विशेष प्रेम केले. कृषीमंत्री होतो, तेव्हा बळीराजाचे ७१ हजार कोटींचे कर्जमाफ केले व किमान आधारमूल्य वाढवत गेलो. परंतु, लोकांना बदल हवा होता. जनतेने 2014 ला बदल करून मोदी सरकार दिल्लीत बसवले. पण, अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे आता या विषयावर बोलायला तयार नाही. शेतीला सरकारकडे स्थानच नाही. ते न दिल्याने देशातील शेती संकटात सापडली आहे. यामुळे मी असेपर्यंत खाणार्‍यापेक्षा पिकविणार्‍यांचा आधी विचार करेल. 2014 ला ज्या व्यापार्‍यांनी उदो उदो करत नरेंद्र मोदींना मतदान केले आता ते त्यांनाच हटवण्याच्या गोष्टी करतात. तेव्हा जनतेने कोणाला निवडायचे हे ठरवावे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, बळीराजाच्या सर्वात जास्त आतमहत्या नरेंद्र व देवेंद्र सरकारच्या काळात झाल्या असून सामान्य जनतेतील कष्टकर्‍यांचे नरेंद्र मोदी नाहीत, हे जनतेला आता पटायला लागले आहे. नरेंद मोदी हे शेतकरी विरोधक तर शरद पवार हे शेतकरी हिताचे निर्णय घेणारे आहेत. विकासाचे राजकारण करण्याऐवजी मोदी व भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंग यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देऊन नको तो मार्ग अवलंबला आहे. ज्यांनी देशासाठी रक्त सांडले, त्यांना या सरकारने असे दिवस आणले. प्रास्तविक अनिल कुंदे यांनी केले. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले.याप्रसंगी जेष्ठ नेते श्रीराम शेटे, काँग्रेसचे जेष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर, सुरेश कमानकर, सिध्दार्थ वनारसे, मविप्र सभापती माणिकराव बोरस्ते, सरपंच अलका बनकर, नाफेडचे माजी संचालक चांगदेव होळकर, राजेंद्र मोगल, निफाड संघाचे अध्यक्ष राजेंद्र डोखळे, रासका माजी अध्यक्ष दत्तात्रय डुकरे आदी उपस्थित होते.