घरCORONA UPDATECoronavirus : देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या स्थितीत - डॉ. हर्षवर्धन

Coronavirus : देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या स्थितीत – डॉ. हर्षवर्धन

Subscribe

भारत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या स्थितीत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

भारत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या स्थितीत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी घोषित करण्याआधी भारताने तयारी केली होती, असेही ते म्हणाले. तर आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, आजपर्यंत कोरोना विषाणूची ३३, ३३६ प्रकरणे निदर्शनास आली आहेत. त्यातील २,३०१ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ५६ पैकी १२ जणांचा काल काल मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण १५७ रुग्ण बरे झाले आहेत.
तबलीगी जमातमुळे १४ राज्यांत पसरला कोरोना
लव अग्रवाल म्हणाले की, गेल्या दोन दिवसात तबलीगी जमातशी संबंधित ६४ हजार ६४७ प्रकरणांचा शोध घेण्यात आला आहे,  त्यात उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, आसाम, दिल्ली, हिमाचल, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू तेलंगणा, उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. लव्ह अग्रवाल म्हणाले की, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना डॉक्टरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
गृह मंत्रालयाचा आणखी दोन टोल फ्री क्रमांक
गृह मंत्रालयाचे सहसचिव पुला सलीला श्रीवास्तव म्हणाले की, आरोग्य व कामगार कामगारांवर हल्ल्याच्या घटनांवर कडक कारवाई करण्यासाठी तसेच वैद्यकीय बंधुतांना सुरक्षितता मिळावी यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात सात हेल्पलाईन क्रमांक होते. आता आम्ही आणखी दोन हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत – १९३० (ऑल इंडिया टॉलफ्री नंबर) आणि १९४४ (डेडिकेटेड टू ईशान्य).

लॉकडाऊननंतर काय?

देशात सध्या कोरोनाचे २ हजार ३०१ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. दरम्यान, लॉकडाऊनचा कार्यकाळ संपत आला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी लॉकडाऊन संपल्यानंतर पुढे काय करायचे असा सवाल उपस्थित केला होता.

मोदींचे अनोखे आवाहन 

दरम्यान, आज शुक्रवारी पंतप्रधानांनी नागरिकांना अनोखं आवाहन केलं आहे. कोरोनाविरोधातल्या या लढ्यात कुणीही स्वत:ला एकटं समजू नये. कोरोनामुळे जो अंधकार निर्माण झालाय, त्याला हरवून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. त्यामुळे या रविवारी ५ एप्रिलला आपल्या सगळ्यांना मिळून कोरोनाला आव्हान द्यायचं आहे. रविवारी रात्री ९ वाजता मला तुम्हा सगळ्यांचे ९ मिनिटं हवी आहेत. घरातल्या लाईट बंद करून घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये उभं राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईलचा फ्लॅश ९ मिनिटं लावा. तेव्हा घरातल्या लाईट बंद कराल, सगळीकडे जेव्हा प्रत्येकजण एकेक दिवा लावेल तेव्हा आपली महाशक्ती दिसून येईल, असं पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -