…आणि किंग खानने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठीतून दिले उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला शाहरूख खानने चक्क मराठीतून उत्तर दिले असून यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

shahrukh khan and uddhav thakrye
उद्धव ठाकरे आणि शाहरुख खान

देशात कोरोना विषाणूचा हाहाकार माजला असताना उद्योगपती, कलाकारांकडून पंतप्रधान तसेच राज्य सरकारला भरखोस मदतीचा ओघ सुरू आहे. अशातच बॉलीवूड किंग शाहरूख खाने यानेदेखील मोठ्या मनाने केंद्र व राज्य सरकारला सहायता निधी दिली आहे. शाहरुखच्या या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहरूख आणि त्यांची पत्नी गौरी यांचे आभार व्यक्त करत तसे ट्विट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ट्विटला शाहरूखने चक्क मराठीतून उत्तर दिले असून यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘थेंबे थेंबे तळे साचे…’

शाहरूख खान यांनी अतिशय साहित्यिक स्वरूपात ट्विट करत थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीचा वापर ट्विटमध्ये केला आहे. शाहरूखने म्हटले आहे की, ही एक लढाई असून या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर एक मदतीचा महासागर तयार होईल. शाहरूखच्या इतक्या मराठी वापरामुळे त्याचे मराठी चाहते नक्कीच हुरळून गेले असतील. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनासाठीही शाहरूखने त्यांचे आभार मानले आहेत.

किंग खानने केली अशी मदत 

कोरोनाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे आता देशाच्या आर्थिक मदतीसाठी सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स, एटंरटेनमेंट कंपनी रेड चिलीज एटंरटेनमेंट आणि रेड चिलीज वीएफएक्स आणि एनजीओ मीर फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. खरंतर मागच्या आठवड्यात ट्विटरवर शाहरुखच्या विरोधात ट्रेंड झाला होता. मदत देत नसल्यामुळे त्यावर टीका देखील करण्यात आली होती. शाहरूख खान, गौरी खान, जुही चावला आणि जय मेहता यांचा आयपीएलमधील केकेआर संघ पंतप्रधान सहायता निधीमध्ये रक्कम दान करणार आहे. तसेच गौरी खान आणि शाहरूख खान यांची रेड चिलीज एंटरटेनमेंट महाराष्ट्र सीएम रिलीफ फंडाला रक्कम दान करणार आहेत.

हेही वाचा –

Coronavirus: टीका झाल्यानंतर आता शाहरूख खान करतोय भरघोस मदत!