खेड तालुक्यात १८६ शिक्षक विविध पुरस्कारांनी सन्मानित

Mumbai
शिक्षकांना पुरस्कारांनी सन्मानित करताना

पुणे जिल्हातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना चांगले दिवस येऊ लागले आहेत. प्राथमिक शाळांची गुणवत्ता आणि दर्जा वाढत चालला आहे. त्यामध्ये शिक्षकांचा महत्वाचा वाटा असलेल्या खेड तालुक्यातील १८६ शिक्षकांना पुरस्कार देऊन शिक्षण विभागाकडून सन्मानित करण्यात आले आहे.

खेड तालुक्यात एकूण ५४७ शाळा आहेत. त्या शाळांमध्ये ९५४७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये ३४११ शिक्षक काम करीत आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे धडे देत असताना पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यातही मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांमध्ये चढाओढ लागली आहे. अशा शिक्षकांचा गौरव करण्याचे खेडचे गट शिक्षण अधिकारी संजय नाईकडे एक संकल्पना राबवली. त्यानुसार, खेड तालुक्यातील महिला आणि पुरुष शिक्षकांना “गुणवंत शिक्षक पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.

शहरीभागासह आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. त्यामुळे मराठी शाळांमध्ये मुले येईनाशी झाली आहेत. मुलांना आकर्षित करण्यासाठी प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी मुलांमधील कलागुणांना वाव देत जास्तीच्या शिक्षणाची जोड देऊन कला,क्रिडा,सामाजिक,सांस्कृतिक, अशा विविध संकल्पना प्राथमिक शाळांमध्ये राबवुन आम्ही कुठे कमी पडत नाही हे दाखवून दिले. त्याच कर्तृत्वाची थाप गट शिक्षण आधिकारी संजय नाईकडे,जीवन कोकणे यांनी शिक्षकांना सन्मानित करुन दिली. यावेळी आमदार सुरेश गोरे,जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,शरद बुट्टेपाटील, बाबाजी काळे,सर्व पंचायत समिती सदस्य सर्व शिक्षक उपस्थित होते

पुरस्काराचे विवरण …..

गुणवंत शिक्षक :-५२,
माध्यामिक शाळेचे गुणवंत शिक्षक :-०४
शिष्यवृत्ती मिळवलेले गुणवंत शिक्षक :- ५९ प्रेरणादायी शाळा :- ०२
उत्कृष्ट माध्यमिक शाळा :-०१
कार्यालयीन पुरस्कार :- १३
विज्ञान प्रदर्शन पुरस्कार :-०२
इंग्रजी अध्ययन समृद्धी पुरस्कार :-०२
जिल्हा स्तरीय पुरस्कार :-०४
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव पुरस्कार :-१३
सीएसआर लोकसहभाग शिक्षक :- ४१

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here