घरताज्या घडामोडीभारतात स्टेज ३ सुरू झालाय, फक्त घोषणा नाही - कोव्हिड टास्कफोर्सच्या समन्वयकाचा...

भारतात स्टेज ३ सुरू झालाय, फक्त घोषणा नाही – कोव्हिड टास्कफोर्सच्या समन्वयकाचा गौप्यस्फोट

Subscribe

आपण स्टेज ३मध्ये आधीच पोहचलोय. फक्त आपण त्याची घोषणा करत नाही आहोत. खर तर भारतात स्टेज ३ ची सुरूवात झाली आहे. आपल्याकडे आधीच खूप थोडा वेळ आहे. येत्या काही आठवड्यात करोनाचा आऊटब्रेक कोणत्याही आठवड्यात होऊ शकतो. पण आपल्याकडे प्रशिक्षित असा वैद्यकीय कर्मचारी वर्ग नाहीए, असा दावा डॉ गिरधर ग्यानी यांनी केला आहे. क्विंट या संकतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. डॉ गिरधऱ ग्यानी हे भारतात कोव्हिड १९ च्या हॉस्पिटल टास्कफोर्सचे समन्वयक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिलला बोलावलेल्या महत्वाच्या डॉक्टरांच्या आणि आरोग्य सेवा पुरवठादारांच्या बैठकीला ते स्वतः उपस्थित होते.

स्टेज ३अंतर्गत कम्युनिटी ट्रान्समिशन हे खूपच महत्वाच आणि क्रिटीकल टप्पा आहे. या टप्प्यात करोनाचा आजार हा अतिशय वेगाने समाजात पसरतो. त्यावेळी नेमके उगमस्थान शोधणे अवघड होऊन जाते. म्हणूनच पहिले पाच ते दहा दिवस हे करोना नियंत्रणासाठी महत्वाचे असतात. ज्यांना काहीही लक्षण नाहीत अशा लोकांना पाच ते दहा दिवसात लक्षण आढळायला लागतात. अजुनही सरकारी पातळीवर जुन्याच पद्धतीचा अवलंब केला जात आहे. करोनासाठी यासगळ्या गोष्टी तातडीने बदलण गरजेच आहे. सद्यस्थितीला सरकारकडून फक्त ज्यांना लक्षण आहेत, अशा लोकांचीच चाचणी करण्यात येत आहे. त्यामध्ये ज्यांना खोकला, ताप, सर्दी, श्वसनाचे विकार असे आजार आहेत अशाच लोकांची सध्या चाचणी होत आहे. या लक्षणांपैकी कोणतेही एक लक्षण असल्यास सध्या चाचणी होत नाही अशी स्थिती आहे.

- Advertisement -

अधिकाधिक लोकांची चाचणी करून करोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण गरजेच आहे. सरकारी पातळीवर देशात आता ११८ टेस्टिंग लॅब उभारण्यात आले आहेत. या लॅबमध्ये दिवसाला १५ हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. त्याशिवाय आणखी १५ लॅबदेखील दररोज वाढवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत सध्याचे सरकारी हॉस्पिटल्स हे कोव्हिड १९ हॉस्पिटलमध्ये बदलण्याचा निर्णय झाला आहे. खाजगी हॉस्पिटलची मदत घेऊन आणि वैद्यकीय उपकरणांसह याठिकाणी हॉस्पिटल्स उभारण्यात येतील असा तो निर्णय़ होता.

भारतात एकट्या दिल्लीतच ३ कोटी लोकसंख्या आहे. दिल्लीसारख्या शहरासाठी आपल्याला ३ हजार बेड्स तयार ठेवावे लागतील. त्यासोबतच कोव्हिड १९ केंद्राची उभारणीही आपल्याला करावी लागेल. ज्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे किंवा जे लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत अशा लोकांसाठी ही केंद्रे उभारावी लागतील. आपल्याकडे असलेले गेस्ट हाऊस किंवा हॉटेल्सची मदत यासाठी घेता येईल.

एक प्रतिक्रिया

  1. टेस्ट करून प्रशासनावर ताण आणण्यापेक्षा कोरोनाची बाधा झाली आहे असे गृहीत धरून प्रत्येकाने घरीच राहून दिवसातून तीन वेळा गरम पाण्याची वाफ घेऊन गरम चहा, कॉफी व गरम सूप काळी मिरी टाकून पिणे, तसेच सकाळ संध्याकाळ गरम दूध हळद पिऊन सात आठ दिवसांत ठणठणीत बरे व्हा…..!!

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -