घरमहाराष्ट्रविना नोंदणी माॅयश्चराईज हँड ग्लोव्हजची विक्री

विना नोंदणी माॅयश्चराईज हँड ग्लोव्हजची विक्री

Subscribe

या विना नोंदणी हँड ग्लोव्हजचा वापर सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरही करत आहेत.

कोणतीही तपासणी करताना, रक्त चाचणी करण्यासाठी हँड ग्लोव्हजचा वापर केला जातो. पण, आता सरकारी हॉस्पिटलमध्ये जे हँड ग्लोव्हज पुरवले जातात ते विना नोंदणी असून त्याची अवैध विक्री केली जात आहे. तर, अशा प्रकारचे हँड ग्लोव्हज डॉक्टरांनी वापरले तर त्यांना कर्करोग होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. शस्त्रक्रिया करताना हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारे मॉईश्चराईज्ड युक्त हँड ग्लोव्हज अवैधरित्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिका हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारे हे ग्लोव्हज अमेरिकन कंपनी उत्पादित असून हे ग्लोव्हज विना नोंदणी विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या कंपनीच्या अवैध उत्पादक आयातीवर कडक लक्ष ठेवण्याची सुचना प्रमुख औषध नियंत्रक विभागाकडून करण्यात आली आहे.

ग्लोव्हजला औषध नियंत्रक विभागाची मान्यता नाही

मेसर्स अॅन्सेल कंपनी ही अमेरिकन स्थित असून या कंपनीकडून एन्कोर अंडरलव्ह नावाचे ग्लोव्हज उत्पादित केले जातात. या ग्लोव्हजमध्ये असलेल्या डॉक्टरांच्या हाताच्या कोरड्या त्वचेला ओलावा मिळतो असा दावा केला जातो. पण, ही एन्कोर अंडरलव्ह ग्लोव्हज अमेरिकत उत्पादित करून भारतात विकली जाते. या ग्लोव्हजला औषध नियंत्रक विभागाची मान्यता नाही. कोणतेही औषध देशात विक्री करण्याआधी औषध नियंत्रक विभागाकडे नोंदणी केली जाते. पण, मेसर्स अॅन्सेल कंपनीने या पावडरची नोंदणी केली नसल्याची बाब ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनने औषध नियंत्रक विभागाच्या ध्यानात आणून दिली. त्यामुळे प्रमुख औषध नियंत्रकांकडून या पावडरच्या आयातीवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हॉस्पिटलमध्ये हे वापरले जातात ग्लोव्हज

पालिका हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया करताना हाताचे ग्लोव्हज वापरले जातात. अशा ग्लोव्हजमध्ये मॉईश्चराईज्ड क्रिम वापरली जाते. त्यामुळे हातांना घाम येत नाही. यातून डॉक्टरांच्या आरोग्यालाही धोका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या चार ते पाच वर्षापासून सदर ग्लोव्हज उत्पादन विना नोंदणी वापरली जात आहे. यातून ड्रग्ज अँड कॉस्मेटिक कायद्याचे उल्लंघन होत असून रुग्णांच्या आरोग्याला आणि परिणामी धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून पालिका हे ग्लोव्हज खरेदी करत आहे.अभय पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -