पुण्यात काश्मीरी तरुणाला मारहाण

पुलवामा हल्ल्यानंतर देशात काश्मीरी नागरिकांबद्दल रोष वाढत चालला आहे. काश्मीरी नागरिकांसाठी पुणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत असतानाच ही घटना घडली आहे.

Pune
crime
प्रातिनिधिक फोटो

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभारात काश्मीरी नागरिकांबद्दल रोष बघायला मिळत आहे. देशातील काही भागांमध्ये काश्मीरी तरुणांवर हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. पुणे हे काश्मीरी लोकांसाठी एक सुरक्षित ठिकाण असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. मात्र यानंतर दोन दिवसातच पुण्यातील एका काश्मीरी तरुणावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या टिळक रोड येथे काल रात्री या तरुणाला मारहाण केल्याचा दावा एका वृत्त वाहिनीद्वारे केला जात आहे. पीडित काश्मीरी हा पुण्यातील टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात कर्मचारी आहे. काल रात्री काही तरुणांनी त्याला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाने अद्याप याची तक्रार पोलिसांकडे केली नाही. मात्र या घटनेनंतर हा काश्मीरी तरुण घाबरला असल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन दिवसा पूर्वी केले होते ट्विट 

जीबरान असे पीडित तरुणाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणाचा भाऊ काश्मीरी मुलांसाठी काम करतो. जीबरान पुण्यात टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यालयात कामाला आहे. काल रात्री टिळक रोड परिसरात काही मुलांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट नाही मात्र काश्मीरी नागिरक असल्यामुळे ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here