घरताज्या घडामोडीपुण्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा, अजित पवारांची कबुली!

पुण्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा, अजित पवारांची कबुली!

Subscribe

– पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. या पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर संबंधीत अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता आहे, काही चुका झाल्या आहेत अशी कबुली दिली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ऑक्सिजन सिलेंडरची जिवढी मागणी आहे तेवढे ते उपलब्ध होत नाहीयेत ही व्सतूस्थिती आहे. अ‍ॅम्ब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बो वर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमंडली.

- Advertisement -

पुण्याचं लॉकडाऊन हळूहळू हटवण्याचं मुख्यमंत्र्यांचं मत होतं, मात्र व्यापाऱ्यांच्या आग्रहामुळे पुण्यातलं लॉकडाऊन हटवावं लागलं, अशी माहिती दिली. शिवाय, २५ ते ३० टक्के नागरिक मास्कचा वापर करत नाहीत, अशी खंत बोलून दाखवली.

“व्यापारी मंडळी लॉकडाऊन उठवायला सांगत आहेत. मग लॉकडाऊन का उठवत नाही.” व्यापारी वर्ग सतत विनंती करत होता. व्यापारी वर्गाच्या आग्रहामुळे लॉकडाऊन उठवावा लागला, असं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी ऑक्सिजनचे सिलेंडर राज्यातल्या काही भागात मिळत नाहीत. वैद्यकीय उपचारासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. त्यामुळे त्याचं प्रमाण वाढवणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

कोरोनाची लस येईपर्यंत सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं गरजेचं आहे. यावेळी अजित पवारांना पुण्यातील जम्बो रुग्णालयासंदर्भात विचारण्यात आलं. पुण्यातील जम्बो रुग्णालया सगळ्या गोष्टी व्यवस्थित उभ्या केल्या. आज रुग्णालय उघडल्यानंतर ८०० रुग्ण व्हायला वेळ लागेल असं काहींना वाटलं. मात्र, जम्बो रुग्णालयात दोन-तीन दिवसात ३००-४०० पर्यंत रुग्णांची संख्या वाढली, असं अजित पवारांनी सांगितलं.


हे ही वाचा – १२ तास रुग्णवाहिकेची वाट पाहिली; कंटाळून ५ कोरोना रुग्ण गावभर हिंडून आले


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -