घरमहाराष्ट्रपुण्यात पोलिसांच्या खांद्यावर चमकणार एलईडी इंडिकेटर

पुण्यात पोलिसांच्या खांद्यावर चमकणार एलईडी इंडिकेटर

Subscribe

लखलखणारे इंडिकेटरमुळे चालकांच्या मनात धडकी

पोलीस हे रात्री अपरात्री कर्तव्यावर असतात तेव्हा लांबून पोलीस दिसावेत म्हणून लोणावळ्याच्या पोलीस ठाण्यात एक प्रात्यक्षिक घेण्यात आले. पोलिसांच्या खांद्यांवर लखलखाट करणारे एलईडी इंडिकेटर असणार आहे. त्यामुळे लांबूनच पोलीस असल्याचे दिसणार असून कर्तव्यवर असणाऱ्या पोलिसांना याचा मोठा उपयोग होणार आहे.

दरम्यान, लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर धुकं, मुसळधार पाऊस असतो अशा ठिकाणी आणि रात्री याचा उपयोग होऊ शकतो. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन याचा विचार करत असून अशा पद्धतीचे लखलखाट करणारे इंडिकेटर हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खांद्यावर प्रायोगिक तत्वावर दिसू शकतात. हे एलईडी इंडिकेटर बॅटरीवर चालणारे असणार आहे.

- Advertisement -

एलईडी इंडिकेटरचे लोणावळ्यात प्रात्यक्षिकं

लोणावळा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर एलईडी इंडिकेटर दिसत आहेत. पण ते प्रात्यक्षिक असल्याचे सांगण्यात येत असून रात्रीच्या वेळी अनेकदा पोलीस हे चौकात उभे असतात तेव्हा ते दिसत नाहीत, अशावेळी अपघात होण्याची शक्यता जास्त असते.  त्यामुळे एलईडी इंडिकेटरचे सध्या लोणावळा शहरात  प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. एलईडी इंडिकेटर हे पोलिसांची सुरक्षा करणार हे नक्की आहे.

लखलखणारे इंडिकेटरमुळे चालकांच्या मनात धडकी

यावेळी, गुजरातमध्ये ही प्रायोगिक तत्वावर असे प्रात्यक्षिक घेतल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. रात्रीच्या वेळी लखलखणारे इंडिकेटर चालकांच्या मनात कारवाईची धडकी भरवत आहेत. अगदी हे इंडिकेटर निर्जनस्थळी पोलिसांना प्रकाशही देऊ शकतात. परंतु, हे एलईडी इंडिकेटर प्रत्यक्षात कर्तव्यवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे कधी येतील हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -