घरमहाराष्ट्रVIDEO: सेल्फिसाठी तरुणांनी घेतला जखमी बिबट्याचा जीव

VIDEO: सेल्फिसाठी तरुणांनी घेतला जखमी बिबट्याचा जीव

Subscribe

या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाच्या हाती लागला. त्यांनी बिबट्यासोबत क्रूरकृत्य केल्याप्रकरणी तीन ग्रामस्थांना अटक केली तर इतर तीन आरोपींचा शोध सुरु आहे.

बिबट्यासोबत सेल्फी काढण्याच्या नादात तरुणांनी जखमी बिबट्याचा जीव घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात ही घटना घडली आहे. कोयलारी येथे जखमी झालेल्या बिबट्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी तरुणांनी त्याला शेपटाला धरुन फरफटत नेले. या घटनेमध्ये ८ महिन्याच्या जखमी बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

सेल्फिसाठी तरुणांनी घेतला जखमी बिबट्याचा जीव

सेल्फिसाठी तरुणांनी घेतला जखमी बिबट्याचा जीव

Posted by My Mahanagar on Thursday, 10 January 2019

- Advertisement -

बिबट्याला फरफटत नेले

कोयलारी येथे काही तरुण जखमी झालेल्या ८ महिन्याच्या बिबट्यासोबत सेल्फी आणि फोटो काढत होते. फोटो काढण्याच्या नादात त्यांनी जखमी झालेल्या बिबट्याचे शेपूट धरुन त्याला फरफटत नेऊन फेकले. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ५ ते ६ तरुण बिबट्यासोबत सेल्फि काढण्यासाठी त्याला फरफटत नेताना दिसत आहे.

तीन आरोपींना अटक

याप्रकरणाची माहिती कळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेत. त्याच्यावर उपचार केले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाच्या हाती लागला. त्यांनी बिबट्यासोबत क्रूरकृत्य केल्याप्रकरणी तीन ग्रामस्थांना अटक केली तर इतर तीन आरोपींचा शोध सुरु आहे. वन विभागाने आतापर्यंत प्रकाश पुराम, लोकेश कापगते आणि आदिप गोंदिल या तरुणांना अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

अहमदनगर- कल्याण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -