घरमहाराष्ट्रनाशिककांदा चाळीवर वीज कोसळून शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

कांदा चाळीवर वीज कोसळून शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Subscribe

जायखेडा : शेतक-्यांच्या वाटेवर कायमच संकटे पेरलेली असतात. मग ती संकटे नापिकीची असो, कर्जबाजारीपणाची असो, शेतमाल हमीभावाची असो अथवा हवामानाची असो. असेच संकट बागलाण तालुक्यातील मेंढीपाडे येथील शेतकऱ्यावर आले असून शेतातील राहत्या घरावर व कांदा चाळीवर वीज पडल्याने कांद्याच्या चाळीसह संसार, शेतीअवजारे आगीत जळून खाक झाली. तर ती आग विझवताना परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. 

जायखेडा व परिसरात वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. रतनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी असे शेतकऱ्याचे नाव असून जायखेडा – नांदिन रस्त्यावरील मेंढीपाडे शिवारातील गट नंबर १६२ / ३ च्या शेतातील राहत्या घरावर वीज पडली. यावेळी लागलेल्या आगीत झापासह लगतच्या कांद्याची चाळीतील ३०० क्विंटल कांदा, तसेच पिस्टन पंप, ठिंबक सिंचन, पाईपलाईन मटेरियल, इनलाईन मटेरियल, इत्यादींसह शेतीअवजारे व संसारोपयोगी सामान जळून खाक झाले आहे. ही घटना सोमवार, दि. १ जून रोजी सायंकाळच्या पाच वाजेच्या दरम्यान घडली. प्रसंगी शेतकरी रतनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी यांचे अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, या आगीमुळे या शेतकऱ्याचे अंदाजे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -