काय म्हणता? डायरेक्ट कल्याण – नाशिक लोकल!!

कल्याण - नाशिक लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास लगेचच लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Mumbai
lonavala-pune-local-train

खुशखबर !! खुशखबर!! ही खुशखबर आहे नाशिककरांसाठी. तसं पाहता मुंबई – नाशिक अंतर काही लांब नाही. पण, प्रवासामुळे मात्र मुंबई – नाशिक प्रवासामध्ये चांगलीच दमछाक होते. नाशिकला ट्रेननं जायचं झालं तर कसारा पर्यंत लोकलनं प्रवास किंवा मग रस्त्यानं ३ तासाचा प्रवास करत नाशिक गाठावं लागतं. पण, मुंबई – नाशिक प्रवासामध्ये होणारी ही धावपळ थांबणार आहे. कारण, आता कल्याण – नाशिक लोकल सुरू करण्याचा विचार सुरू आहे. लवकरच कल्याण – नाशिक लोकलची चाचणी होणार आहे. दरम्यान, ही चाचणी यशस्नी झाल्यास कोणतीही वेळ न दवडता लगेचच कल्याण – नाशिक लोकल सेवा सुरू होणार आहे. शिवाय, मुंबई – नाशिक लोकल सुरू करण्याचा विचार देखील असून  त्यासाठी लवकरच चाचणी होणार आहे. त्यामुळे या चाचण्या यशस्वी झाल्यास डायरेक्ट मुंबई – नाशिक लोकल सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई – नाशिक या प्रवासासाठी लागणारा वेळ देखील कमी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here