घरट्रेंडिंगमराठा आंदोलकांची तब्येत खालावली...

मराठा आंदोलकांची तब्येत खालावली…

Subscribe

गेल्या ३० दिवसांपासून सुरू आहे मराठा आंदोलकांचे विविध मागण्यांसाठीचे आंदोलन

गेल्या ३० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना उपचारासाठी आज सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने अखेर या आंदोनकर्त्यांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही या आंदोलनाची दखल महाविकास आघाडी सरकारने घेतला नसल्याचा आंदोलनकर्त्यांचा दावा आहे. मराठा आंदोलनकर्त्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या पाठपुराव्यासाठी गेल्या महिन्याभरापासून आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे.

चर्चेसाठी भलतेच लोक जातात
मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनात वेगळाच प्रकार समोर आला आहे. अनेक दिवसांपासून मराठा आंदोलक आझाद मैदानात प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र मंत्र्यांसोबतच्या बैठकीत आंदोलकांऐवजी वेगळ्याच मुलांना नेत असल्याचा आरोप आंदोलक तरुणांनी केला आहे.

- Advertisement -

म्हणून पुकारले आहे आंदोलन
मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार राज्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी या तरुणांची आहे. आणि जोपर्यंत नियुक्त्या मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलक तरुणांनी घेतला आहे. मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. या कलमानुसार असं सांगण्यात आलं आहे की, 9 जुलै 2014 ते 14 नोव्हेंबर 2014 या कालावधीमधील जाहिराती, नियुक्त्या, प्रवेश हे कलम 18 प्रमाणे संरक्षित आहेत. त्यामुळे त्यानुसार कलम 18 आणि 11 जुलैचा शासन निर्णय लागू करून आम्हाला नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -