घरमहाराष्ट्रअल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी गजाआड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी गजाआड

Subscribe

दोन वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला पपिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ आणि फोटो वायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा शरीरसंबंध ठेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरोधात चिखली पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पीडित अल्पवयीन मुलीचा ओळखीचा असून त्याने मुलीच्या आई-वडील आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपी पीडितेच्या ओळखीचा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. पीडित मुलगी ही इयत्ता ९ ते १० वी शिक्षण घेत होती. नराधम तरुणाने पीडित तरुणीला फुस लावून मैत्रीच्या जाळ्यात ओढले. अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपी नेहमी तिचा पाठलाग करायचा. एकेदिवशी तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊन बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले. यावेळी आरोपीने पिडीतेचे फोटा काढले. संबंधित घटना पीडित मुलीने आई वडिलांना सांगितली. तेव्हा पीडित मुलीच्या आई वडील आणि बहिणीला आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली.

- Advertisement -

शारीरिक संबंधाची मागणी

पीडित अल्पवयीन मुली बरोबर शारिरीक संबंध ठेवताना काढलेले व्हिडिओ आणि फोटो तिच्या वैयक्तिक मोबाईलवर पाठवून पुन्हा शारिरीक संबंधाची मागणी केली. मुलगी घाबरली होती. तिने त्यास नकार दिला असता. हेच फोटो पीडित मुलीच्या मावस भावाला पाठवले. ही घटना २०१६ ते २०१९ या वर्षात घडली असून बुधवारी उशिरा मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -