घरमहाराष्ट्रआमदार गेला असला तरी मनसे पुन्हा उभारी घेईल, शरद पवारांना विश्वास

आमदार गेला असला तरी मनसे पुन्हा उभारी घेईल, शरद पवारांना विश्वास

Subscribe

मनसेचा एकुलता एक आमदार पक्ष सोडून गेला असला तरी मनसेला काहीही फरक पडणार नाही. त्यांची राज्यात ताकद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे आमदार वाढतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. यामुळे मनसे राजकीय पक्ष म्हणून संपलाय का? असा प्रश्न शरद पवार यांना आज विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले की, एक माणूस सोडून गेल्यामुळे पक्ष संपत नसतो. मनसेची राज्यात ताकद आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्यांची ही ताकद पुन्हा दिसेल आणि मनसेचे विधानसभेतील आकडे वाढलेले पाहायला मिळतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

हे वाचा – …तरच भाजपला बारामती जिंकता येईल; जयंत पाटील यांनी सांगितला फॉर्म्युला

आज यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त मुबंई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी मनसेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. तसेच लोकसभा निवडणुकीत मनसे आघाडीत आहे की नाही? तसेच मनसेला लोकसभेचा कोणता मतदारसंघ देणार याबाबत पवार यांनी भाष्य करणे टाळले. मात्र मनसे राजकीय पक्ष म्हणून आपली ताकद दाखवले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हे वाचा – लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान होणार नाहीत – शरद पवार

आघाडीत मनसेला घेणार की नाही? याबाबत पवारांनी भाष्य करणे टाळले असले तरी वंचित बहुजन आघाडीसोबत आम्ही म्हणजे राष्ट्रवादीने कोणतीही चर्चा केली नाही, असा खुलासा त्यांनी केला. “आम्ही कधीही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोललो नाही. आम्हाला काही इंटरेस्ट नाही. त्यांची शक्ती असेल तर त्यांनी वेगळे लढावे. आमच्यासोबत आंबेडकर कधी होते?” असा प्रतिप्रश्नच त्यांनी पत्रकारांना विचारला. तसेच राजू शेट्टीच्या स्वाभिमानी पक्षासोबत राष्ट्रवादीचे एकमत झाले असून काँग्रेससोबत स्वाभिमानीची चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -