घरमहाराष्ट्रबारामती जिंकायचीच असल्याने मोदींची प्रचार सभा लांबणीवर

बारामती जिंकायचीच असल्याने मोदींची प्रचार सभा लांबणीवर

Subscribe

जिंकून आणण्याचा भाजपने पण केलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणारी १० एप्रिलची जाहीर सभा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर ही सभा झाली तर सभेचा चांगला उपयोग होईल आणि भाजपच्या पदरात विजय येईल, असे मनसुबे भाजप नेत्यांनी आखले आहेत. या मनसुब्यात अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभर दोनशेहून अधिक सभा होणार आहेत. या सभांचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने राज्यातील सभांचे नियोजन पुन्हा एकदा निश्चित करण्यात येणार आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आज ही माहिती दिली. मोदी यांच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमामुळे १० एप्रिल ऐवजी पुढच्या टप्प्यात बारामती मतदारसंघात सभा घेतली जावी, असा प्रयत्न असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बारामतीची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकायचीच असल्याने भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करीत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

नरेंद्र मोदी यांची या मतदारसंघात सभा व्हावी असा सर्वांचाच आग्रह असल्याने मोदी यांनी ती मान्य केली आहे. सभेची तारीख निश्चित होताच त्याची घोषणा केली जाईल, असेही पाटील यांनी जाहीर केले. शेवटच्या टप्प्यात सभा घेतल्याचा अधिक लाभ मतदानातून होतो, अशी अटकळ असल्यानेही कदाचित ही सभा शेवटच्या टप्प्यात व्हावी, अशी भाजपची व्यूहरचना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -